अहमदपुरात एकाच दिवसात दीडशे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:19 IST2021-04-10T04:19:28+5:302021-04-10T04:19:28+5:30
शहर व तालुक्यात दोन दिवसांपासून १०० पेक्षा अधिक बाधित आढळून येत आहेत. त्यांच्या संपर्कातील काहींना लागण होत आहे. गुरुवारी ...

अहमदपुरात एकाच दिवसात दीडशे पॉझिटिव्ह
शहर व तालुक्यात दोन दिवसांपासून १०० पेक्षा अधिक बाधित आढळून येत आहेत. त्यांच्या संपर्कातील काहींना लागण होत आहे. गुरुवारी कोरोना चाचणीसाठी ग्रामीण रुग्णालयात गर्दी झाली होती. ३५० चाचण्यांत ५० बाधित आढळले. बाधितांची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे मरशिवणी येथील कोविड केअर सेंटरमध्ये ८४ जणांवर उपचार सुरु आहेत. शासकीय यंत्रणेवर ताण येऊ नये म्हणून ग्रामीण रुग्णालयातील एका कक्षात १५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच दोन खासगी रुग्णालयात प्रत्येकी २५ ऑक्सिजनयुक्त खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयास परवानगी देण्यात आल्याने तालुक्यातून लातूर, उदगीर व नांदेड येथे जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबतची पाहणी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय बिराजदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे यांनी करुन काही सूचना केल्या.
कोविड केअर सेंटरमधील रुग्णांसाठी हॉस्पिटल सुविधा...
शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये ८४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील एखाद्यास त्रास होत असल्यास पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय व दोन खासगी रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी सांगितले.