जुने रेल्वेस्थानक... लातूर बातमी - २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST2021-09-19T04:21:27+5:302021-09-19T04:21:27+5:30

पाेलिसांकडे ही या ठिकाणांची यादी... लातूर शहरात माेकळ्या आणि पडीक असलेल्या जागेत गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. निर्जन स्थळ आणि ...

Old railway station ... Latur News - 2 | जुने रेल्वेस्थानक... लातूर बातमी - २

जुने रेल्वेस्थानक... लातूर बातमी - २

पाेलिसांकडे ही या ठिकाणांची यादी...

लातूर शहरात माेकळ्या आणि पडीक असलेल्या जागेत गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. निर्जन स्थळ आणि ज्या रस्त्यावर वाहतूक कमी आहे. अशा ठिकाणी वयाेवृद्ध मंडळी, महिला, मुलींना फिरणे कठीण आहे. अशा निर्जन स्थळांची पाहणी करून येथे पाेलिसांनी छापा मारला पाहिजे. काही गुन्हेगार हाती लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. साराेळा राेड परिसर, रिंग राेड परिसर सायंकाळी निर्जन असताे. शहरातील अशा स्थळांची पाहणी पाेलिसांकडून हाेण्याची गरज आहे.

या भागात पाेलीस कर्मचारी दिसत नाहीत...

सायंकाळच्या सुमारास, रात्री ८ ते १० या वेळत लातुरातील रिंगराेड, कव्हा राेड, कातपूर राेड, राजीव गांधी चाैक ते गरुड चाैक, साराेळा राेड परिसर, नांदेड राेड परिसर, मळवटी राेड परिसर, गरुड चाैक ते नवीन रेणापूर नाका परिसर, भांबरी चाैक परिसर, कळंब राेड, बार्शी राेड परिसर, जुने रेल्वे स्थानक, डालडा फॅक्टरीचा परिसर यासह इतर निर्जन ठिकाणी पाेलीस दिसून येत नाहीत. परिणामी, गुन्हेगारांच्या हालचाली वाढत असल्याचे समाेर आले आहे. शहरातील सर्वच निर्जन स्थळांवर पाेलिसांची नजर असण्याची गरज आहे.

धमकावत लुटण्याचे प्रकार आता वाढले...

पहाटे आणि सायंकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्यांना लक्ष करत काही टवाळखाेरांकडून शस्त्रांचा धाक दाखवत लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. काही प्रमाणात पाेलीस ठाण्यांकडे तक्रारी दाखल हाेतात तर काही घटनांत तक्रार येत नाही. महाविद्यालयाीन मित्र-मैत्रिणीला लुबाडण्याचे प्रकारही अलीकडे लातुरात घडले आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत माेटारसायकलवरून आलेल्यांकडून लुबाडण्याचे प्रमाण वाढले आहे.

Web Title: Old railway station ... Latur News - 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.