शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

जिरेनियम लागवडीतून तेलनिर्मिती; शेतकरी झाला लखपती !

By संदीप शिंदे | Updated: May 23, 2023 20:50 IST

होसूर येथील दत्तात्रय बगदरे यांचा पाच एकरावर प्रयोग

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील होसूर येथील शेतकरी दत्तात्रय बगदरे यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रावर जिरेनियमची लागवड केली आहे. त्यातील एक एकरमधील पिकातून तेलनिर्मिती करीत त्यांनी चार महिन्यांत सव्वा लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.

होसूर येथील प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय माधवराव बगदुरे यांनी पारंपरिक पीक पध्दतीला फाटा देत आपल्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुुरू केला. त्यातूनच त्यांनी कोरपड, आवळा, हळद व अद्रक, चंदनशेती अशी पिके घेतली. शिवाय फुलकोबी व मिरची यांसारखी भाजीपाल्याचीही पिके घेतली. त्यातून भरघोस उत्पन्न घेतले. सध्या ११ एकर क्षेत्रावर चंदन आहे. सोबतच पाच एकर क्षेत्रावर त्यांनी जिरेनियमसारखे नवीन पीक घेतले आहे.

या पिकाची जानेवारी महिन्यात लागवड केली असून, याची कापणी सुरू आहे. सव्वा एकर क्षेत्रावरील जिरेनियम पिकावर प्रक्रिया करून ११ किलो तेलाचे उत्पादन मिळाले आहे. एक किलो तेलाचा दर १० हजार रुपये आहे. दर तीन महिन्यांनी पिकाची कापणी करता येते. वर्षातून चार वेळेस कापणी केली जाते. जिरेनियमची एकदा लागवड केल्यानंतर तीन वर्षापर्यंत हे पीक कापणी करता येते, असेही बगदरे यांनी सांगितले.

मल्चिंग पेपरद्वारे तणाचा बंदोबस्त...जिरेनियमच्या शेतामध्ये तणाचा बंदाेबस्त करण्यासाठी बगदरे यांनी मल्चिंग पेपरचा वापर केला. प्रारंभी पाच एकर जिरेनियम लागवडपैकी १ एकर १० गुंठे क्षेत्रातील कापणी करून प्रक्रिया केली. यात ११ किलो तेल काढले. या तेलाची मुंबई येथे विक्री केली असता त्याला १० हजार रुपयांचा दर आहे. वर्षभरात तीन वेळा कटिंग करून तेल काढले जाते. वर्षभराचे एकरी उत्पन्न सव्वा तीन लाखांपर्यंत असून, खर्च वजा जाता दीड ते दोन लाख रुपये उरतात. - दत्तात्रय बगदुरे, शेतकरी

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीagricultureशेती