वीज कनेक्शन तोडनाऱ्या अधिकाऱ्यांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:25 IST2021-02-27T04:25:55+5:302021-02-27T04:25:55+5:30
निलंगा : माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा इशारा निलंगा : लाॅकडाऊनच्या कालावधीत शेतकरी, व्यापारी, नागरिकांना भरमसाठ वीजबिल देऊन ...

वीज कनेक्शन तोडनाऱ्या अधिकाऱ्यांनी
निलंगा : माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा इशारा
निलंगा : लाॅकडाऊनच्या कालावधीत शेतकरी, व्यापारी, नागरिकांना भरमसाठ वीजबिल देऊन त्याची सक्तीने वसुली केली जात आहे. त्यासाठी महावितरणने ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडत आहे. हे थांबवा, अन्यथा अधिकाऱ्यांना खुर्ची लिलावाची आठवण करून द्यावी लागेल, असा इशारा माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी महावितरणला दिला आहे.
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, लॉकडाऊनमुळे ५ महिने व्यापार बंद होता. बाजारपेठेत शुकशुकाट होता. एखाद्याने दुकान उघडले तर दंडात्मक कारवाई केली जात होती. अशा परिस्थितीत बंद दुकानचे ७० ते ८० हजार रुपये बिल येतेच कसे? झोपडीच्या घरातही १५ ते २५ हजारांपर्यंतचे वीजबिल महावितरण कंपनीने दिले आहे. हा अन्याय कधीही खपवून घेतला जाणार नाही.
तर आमच्याशी गाठ...
निलंगा शहरातील काही वस्तीमध्ये १२- १२ तासांचे भारनियमन केले जाते. हाअन्याय आहे. शासनाच्या परिपत्रकाचा बाऊ करीत शेतकऱ्यांचे सरसकट वीज कनेक्शन तोडले जात आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात आता विहिरीला पाणी असूनही पिकाला पाणी देता येत नाही. त्यामुळे महावितरणच्या अधिका-यांनी कुणाचेही वीज कनेक्शन तोडू नये, अन्यथा आमच्याशी गाठ आहे, असा इशाराही माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला.