लठ्ठपणाचे आजार तीनपटीने वाढणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:16 IST2021-05-29T04:16:32+5:302021-05-29T04:16:32+5:30
लठ्ठपणा म्हणजे काय? बॉडी मास्क इंडेक्स (बीएमआय) ही एक गणना आहे. जी शरीराचे आकार मोजण्यासाठी एखाद्याचे वजन आणि उंची ...

लठ्ठपणाचे आजार तीनपटीने वाढणार !
लठ्ठपणा म्हणजे काय?
बॉडी मास्क इंडेक्स (बीएमआय) ही एक गणना आहे. जी शरीराचे आकार मोजण्यासाठी एखाद्याचे वजन आणि उंची विचारात घेतली जाते. प्रौढांमध्ये बीएमआय ३० पेक्षा जास्त असणे म्हणजे लठ्ठपणा समजला जातो.
लठ्ठपणा अनुवंशिकतेमुळे असू शकते. त्याचबरोबर उच्च कॅलरीयुक्त पदार्थ खाणे, पुरेशी झोप नसणे, याशिवाय आरोग्याच्या विशिष्ट परिस्थितीमुळेही वजन वाढते.
जंकफूड खाणे, व्यायाम न करणे यासोबतच स्टीरॉईड किंवा गर्भनिरोधकसारख्या गोळ्यांमुळेदेखील वजन वाढण्याचा धोका असतो.
गुंतागुंत निर्माण करणारा लठ्ठपणा
चरबीच्या उच्च प्रमाणामुळे हाडांमध्ये किंवा अंतर्गत अवयवांवर ताण पडतो, शरीरात जळजळ वाढते, मधुमेहामध्ये लठ्ठपणा हा जोखमीचा घटक आहे.
लठ्ठपणावर उपचार कसा केला जातो
लठ्ठपणा कमी करण्यास स्वत: सक्षम नसाल तर वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. ज्यामध्ये आहार तज्ज्ञ, डॉक्टर्स यांची मदत हवी. काही वेळा औषधे किंवा वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेचीदेखील शिफारस केली जाऊ शकते.
आपण लठ्ठपणा कसा रोखू शकतो
वैयक्तिक पातळीवर आरोग्यदायी जीवनशैलीची निवड करून आपण लठ्ठपणा रोखू शकतो. दररोज २० ते ३० मिनिटे चालणे, पोहणे, दुचाकी चालविणे असे मध्यम व्यायामाचे लक्ष्य ठेवा. पौष्टिक पदार्थ, फळे, भाज्या आणि पातळ प्रथिने निवडून भोजन करणे उच्च चरबीयुक्त आणि कॅलरीयुक्त आहार कमी करणे हा उपाय होऊ शकतो.
-डॉ. दीपक गुगळे, पोटविकार तज्ज्ञ