रुग्णसंख्या घटल्याने कोविड केअर सेंटर होताहेत रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:15 IST2021-06-01T04:15:25+5:302021-06-01T04:15:25+5:30
५ हजार १२० बेड रिकामे शासकीय व खासगी मिळून १२७ संस्थांमध्ये ८ हजार ८ बेडची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली ...

रुग्णसंख्या घटल्याने कोविड केअर सेंटर होताहेत रिकामे
५ हजार १२० बेड रिकामे
शासकीय व खासगी मिळून १२७ संस्थांमध्ये ८ हजार ८ बेडची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे. सध्या १ हजार ५६ रुग्ण भरती आहेत. त्यामुळे ५ हजार १२० बेड शिल्लक आहेत. यामुळे आरोग्य विभागाचा ताण थोडा कमी झाला आहे. तरीही धोका टळलेला नाही. नागरिकांनी नियमित मास्क वापरणे, सुरक्षित अंतर पाळणे आणि वारंवार हात धुणे याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
लसीकरणाचाही आकडा वाढला
संथगतीने का होईना आतार्यंत ३ लाख १० हजार ३२८ व्यक्तींनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. दोन्ही डोसची संख्या ३ लाख ८४ हजार ८३१ झाली आहे. ७४ हजार ५०३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. फ्रंटलाईन वर्कर गटात ५१ हजार ८४४, आरोग्य कर्मचारी गटात ३३ हजार १४८, ४५ ते ६० वयोगटांत १ लाख २० हजार २८१ आणि ज्येष्ठ नागरिक गटात १ लाख ६३ हजार २९७ लसीचे डोस झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.