काेराेना बाधितांची संख्या वाढली, देवणी, वलांडी, बाेराेळात लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:21 IST2021-03-23T04:21:04+5:302021-03-23T04:21:04+5:30
बैठकीत आगामी काळात काेराेनाचा सामना करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यासाठी नियोजन करण्यात आले. यानुसार तालुक्यात कोरोनो चाचणीचे प्रमाण वाढविण्यात ...

काेराेना बाधितांची संख्या वाढली, देवणी, वलांडी, बाेराेळात लस
बैठकीत आगामी काळात काेराेनाचा सामना करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यासाठी नियोजन करण्यात आले. यानुसार तालुक्यात कोरोनो चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येतील, त्यांना त्या-त्या पद्धतीने पुढील उपचाराची सोय उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याचबराेबर देवणी, वलांडी, बोरोळ येथील शासकीय रुग्णालयात कोरोना प्रतिबंधित लस देण्याचा दैनंदिन कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून, देवणी येथील कोविड केअर सेंटर रुग्णाच्या सेवेत सुसज्ज आणि अद्ययावत करून ठेवण्यात आले आहे.
याशिवाय शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याचे बैठकीत ठरले. या बैठकीला गट विकास अधिकारी मनोज राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप गुरमे, नायब तहसीलदार शेख हिसामोद्दिन, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. शितल अकेघरे, डॉ. पी.एन. कलंबरकर, डॉ. हते, नगरपंचायतचे सुनीत देबडवार, अमोल बाजुळगे, नाझीम मोमीन, आरोग्य विभागाच्या के.आर. सुसदकर, कोपरकर आणि चिल्लरगे आदी उपस्थित होते.