आता कानांना ऑटोमायकोसिसचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:13 IST2021-06-30T04:13:52+5:302021-06-30T04:13:52+5:30

पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका १.ऑटोमायकोसिसचे रुग्ण वर्षभर आढळून येत असतात. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात त्याचे प्रमाण अधिक असते. पावसात भिजल्याने पाणी ...

Now the risk of autoimmunity to the ears | आता कानांना ऑटोमायकोसिसचा धोका

आता कानांना ऑटोमायकोसिसचा धोका

पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका

१.ऑटोमायकोसिसचे रुग्ण वर्षभर आढळून येत असतात. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात त्याचे प्रमाण अधिक असते. पावसात भिजल्याने पाणी कानात जाते, कान वेळेवर कोरडे न केल्याने कानात पाणी साचून राहते. त्यामुळे कान दुखण्याची समस्या उद्भवते.

२. कानातील मळ काढण्यासाठी अनेकजण कानात तेल टाकत असतात. शिवाय कापसाच्या काडीने कान साफ केले जातात, तर काहीजण जुने कुठलेही ड्राॅप्स कानात टाकत असतात. इअर फोनचा सतत वापर यामुळे ऑटोमायकोसिसचा त्रास होऊ शकतो, असे डॉक्टर म्हणाले.

काय घ्याल काळजी...

ऑटोमायकोसिसचा धोका टाळण्यासाठी कान कोरडे ठेवणे. अंघोळीचे पाणी तसेच पावसाचे पाणी कानात गेल्यानंतर कानाला हात न लावता मान वाकडी करून पाणी बाहेर येऊ द्यावे. कापसाच्या काड्या कानात घालणे टाळावे, तसेच मळ काढण्यासाठी कानात तेल टाकणे टाळावे, इअर फोनचा वापर कमी करावा, जुने ड्राॅप्स कानात टाकू नये, टोकदार वस्तूने कान स्वच्छ करणे टाळावे. कानाचा त्रास उद्भवू लागल्यास घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.

कोट...

पावसाळ्यात ऑटोमायकोसिसचा धोका संभवतो. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. कानातील मळ काढण्यासाठी कानात तेल टाकणे धोक्याचे ठरू शकते. नागरिक कानात दुखत असल्यास कुठलाही ड्राॅप्स कानात सोडत असतात. त्यामुळे कानाचे त्रास उद्भवतात. याेग्य काळजी घेतल्यास आजारापासून बचाव करता येऊ शकतो. -डॉ. विनोद कंदाकुरे, कान-नाक-घसा तज्ज्ञ

पावसात भिजल्यानंतर, कानात पाणी गेल्यानंतर तत्काळ कान कोरडे करणे गरजेचे असते. कान दुखू लागल्यास किंवा कानातून पाणी येऊ लागल्यास त्वरित उपचार घ्यावे. तत्काळ उपचार न घेतल्यास बहिरेपणा येऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

- डॉ. प्रदीप खोकले, कान-नाक-घसा तज्ज्ञ

Web Title: Now the risk of autoimmunity to the ears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.