वन रूम किचन नव्हे... जिम रूम किचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:20 IST2021-04-04T04:20:09+5:302021-04-04T04:20:09+5:30
लातूर : गतवर्षी जवळपास दोन ते तीन महिने कोरोनामुळे लाॅकडाऊन होते. आताही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील मैदाने कुलूपबंद आहेत. त्यामुळे ...

वन रूम किचन नव्हे... जिम रूम किचन
लातूर : गतवर्षी जवळपास दोन ते तीन महिने कोरोनामुळे लाॅकडाऊन होते. आताही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील मैदाने कुलूपबंद आहेत. त्यामुळे घरच्या घरीच व्यायाम करीत नागरिक आपल्या शारीरिक कसरतीवर भर देत आहेत. परिणामी, वन रूम किचनऐवजी जिम रूम किचनची संकल्पना लातुरात पुढे येवू लागली आहे.
शहरात क्रीडा संकुल, नाना-नानी पार्क, दयानंद महाविद्यालय वाॅकिंग ट्रॅक, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यासह अनेक ठिकाणच्या वाॅकिंग ट्रॅकवर सकाळ, सायंकाळच्या सत्रात नागरिक व्यायाम करीत असतात. मात्र, कोरोनामुळे यावर बंधने आली आहेत. गतवर्षीही अनेक दिवस लाॅकडाऊन होते. यंदाही मैदाने बंद आहेत. त्यामुळे लातूरकरांनी घरच्या घरीच व्यायामाला पसंती दिली आहे. परिणामी, व्यायामासाठी घरातच जिम साकारली जात आहे. काही जणांनी तर बाल्कनीच्या पोर्चवर व्यायामाचे साहित्य थाटून आपली व्यायामाची आवड कायम ठेवली आहे. घरच्या घरीच ट्रेड मिल, इन्डोअर सायकल, रजिस्टन्स ट्यूब, जिम बाॅल, वेटलिफ्टिंग प्लेट बार आदी साहित्य आणून कोरोनाकाळातही प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्यायामाची लय कायम ठेवली आहे.
घरच्या घरी व्यायाम करण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे जिमच्या साहित्याची विक्री वाढली आहे. कोरोनानंतर गतवर्षीपासून व्यायामाचे साहित्य घेणाऱ्याची संख्या वाढली आहे. घरच्या घरीच नागरिक व्यायाम करत असल्याने जिमच्या साहित्याला मागणी वाढल्याचे व्यावसायिक अक्षय तांदळे, गणेश सूर्यंवशी यांनी सांगितले.
———————————-
मी पूर्वी मैदानावर नियमित व्यायाम करत असत. गतवर्षी कोरोनानंतर पडलेल्या लाॅकडाऊनमुळे खंड पडला. घरच्या घरीच व्यायाम करण्याचे ठरविले असून, घरातच व्यायामाचे साहित्य आणले आहे. शारीरिक कसरतीमुळे कोरोनाविरूद्ध लढण्याची ताकद मिळते. त्यामुळे घरच्या घरीच जिम तयार केली असून, यावर मी दैनंदिन व्यायाम करत असल्याचे शिरीष गारठे यांनी सांगितले. घरच्या घरी व्यायाम करण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे जिमच्या साहित्याची विक्री वाढली आहे. कोरोनानंतर गतवर्षीपासून व्यायामाचे साहित्य घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. घरच्या घरीच नागरिक व्यायाम करत असल्याने जिमच्या साहित्याला मागणी वाढल्याचे व्यावसायिक अक्षय तांदळे, गणेश सूर्यंवशी यांनी सांगितले.