औराद शहाजानी बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:19 IST2021-05-14T04:19:22+5:302021-05-14T04:19:22+5:30
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही महत्त्वाची आहे. येथील बाजार समितीत जिल्ह्यातील ५० ते ६० ...

औराद शहाजानी बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही महत्त्वाची आहे. येथील बाजार समितीत जिल्ह्यातील ५० ते ६० तसेच शेजारील कर्नाटक राज्यातील ३० गावांतील शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठी येतो. येथील बाजार समितीचा लोकनियुक्त सभापती व संचालकांचा कार्यकाळ संपुष्टात असल्याने महाविकास आघाडी सरकारने काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची बाजार समितीचे अशासकीय प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. यात हाजिउद्दीन सराफ (औराद), लक्ष्मण कांबळे (तगरखेडा), बस्वराज वलांडे (औराद), गंगाधर चव्हाण (बसपूर), संजीव बडुरे (माळेगाव), श्रीनिवास सूर्यवंशी (माकणी) यांची नियुक्ती केल्याचे सहायक निबंधकांच्या पत्रात म्हटले आहे. सदर निवडी पालकमंत्र्यांच्या शिफारसीवरुन करण्यात आल्या आहेत. या अशासकीय प्रशासक मंडळाने गुरुवारी बाजार समितीत जाऊन पदभार घेतला. या निवडीचे स्वागत हाेत आहे.