राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाडण्यात यावे, यासाठी अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात यावी, असे आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयास देण्यात आले. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशा तिन्ही पक्षातील सहा सदस्यांच्या मंडळाची नियुक्ती केली आहे. नूतन सदस्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळात मुख्य प्रशासक म्हणून लक्ष्मणराव बोधले (अजनी बु.), उपमुख्य प्रशासक म्हणून कल्याणराव बर्गे (साकोळ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक म्हणून सादात पटेल (उजेड), व्यंकट ढोपरे (उमरदरा), मोहनराव भोसले (धामणगाव), शिवसंतोष देशमुख (अंकुलगा राणी) यांचा समावेश आहे.