तीन दिवस बिदर-मुंबई रेल्वे...
लातूरहून मुंबईला जाणा-या प्रवाश्यांची संख्या मोठी आहे. लॉकडाऊनपुर्वी मुंबईला जाण्यासाठी वेटींग करावे लागायचे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे प्रवासी घटले आहेत. सध्या लातूर-मुंबई, आणि बिदर-मुंबई, लातूर-यशवंतपूर या रेल्वे धावत आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवासात मास्क, फिजिकल, डिस्टन्स सॅनिटायझर आदी उपाययोजनांचे पालन केले जात आहे. मात्र, वाढती रुग्णसंख्या घटत असलेल्या प्रवासी संख्येला कारणीभूत ठरत आहे.
लॉकडाऊनपुर्वी अनेक शहरासांठी रेल्वे...
परिस्थिती पुर्वपदावर असताना अमरावती, पुणे, हैद्राबाद, बिदर, नांदेड, परळी, मिरज, निजामाबाद, नांदेड-पनवेल आदी शहरांसाठी रेल्वे धावत होत्या. मात्र, लॉकडाऊनमुळे या रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत. सध्या लातूर रेल्वेस्थानकातून लातूर यशवंतपूर, लातूर-मुंबई, बिदर-मुंबई याच रेल्वे धावत आहेत.
कोराेनाच्या पार्श्वभुमीवर काही रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत. सध्या ज्या रेल्वे धावतात. त्यांना प्रवाश्यांचा अल्प प्रतिसाद आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवासात मास्क, फिजिकल, डिस्टन्स आदी उपाययोजनांवर भर दिला जात आहे. कोरोनाची परिस्थिती पुर्वपदावर आल्यानंतर मागणीनुसार रेल्वे सुरु करण्यासाठी पाठपुरावा करु. - बी.के. तिवारी, स्टेशन प्रबंधक.