शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

ना शाळा, ना परीक्षा; तरीही साडेपाच लाख विद्यार्थी पास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST

जिल्ह्यात जि.प.च्या १ हजार २८४, माध्यमिक ५७० तर कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या २९८ आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा ...

जिल्ह्यात जि.प.च्या १ हजार २८४, माध्यमिक ५७० तर कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या २९८ आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. मध्यंतरी दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले होते; मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने सदरील वर्ग बंद करण्यात आले. सध्या अनलॉक होत असले तरी शाळा सुरु करण्याबाबत निर्णय झालेला नाही. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यातच दहावी आणि बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ५ लाख ५० हजार २३४ विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण होत असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.

वर्गनिहाय विद्यार्थी...

पहिली - ४६७७८

दुसरी - ४६७३३

तिसरी - ४६६२१

चौथी - ४७६९९

पाचवी - ४९२१५

सहावी - ४८४८८

सातवी - ४९६३७

आठवी - ४९२९३

नववी - ४८४६५

दहावी - ४७२९४

अकरावी - ३३५९३

बारावी - ३६४१८

जि.प.शाळा - १२८४

माध्यमिक शाळा - ५७०

कनिष्ठ महाविद्यालये - २९८

ऑनलाईन शिक्षण...

फायदे - कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात विद्यार्थ्यांचे आराेग्यहित लक्षात घेता ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यात आला.

घरच्या घरीच मुलांचा अभ्यास होत आहे. सोबतच शाळांच्या वतीने नियमित तासिकांचे नियोजन करण्यात येत आहे.

शाळेत गेल्यास अनेकांशी विद्यार्थ्यांचा संपर्क येऊ शकतो. त्यामुळे कोरोनाच्या काळात ऑनलाईनचा पर्याय चांगला वाटतो.

तोटे - जिल्ह्यात अनेक बालके मोबाईलची सुविधा नसल्याने ऑनलाईन अभ्यासापासून वंचित आहेत. त्यांच्यापर्यंत अद्यापही शिक्षण पोहोचले नाही.

अनेक गावात नेटवर्कचा अडथळा असल्याने ऑनलाईन अभ्यासात अडथळा येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालकांतून नाराजी आहे.

ऑनलाईन शिक्षणांत विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन होत नाही. त्यामुळे ऑफलाईन शिक्षणच बरे असा पालकांचा आग्रह आहे.

शहरे - शहरात ऑनलाईन अभ्यासक्रमाला गती मिळालेली आहे. विद्यार्थ्यांचा चांगला सहभाग आहे. शाळांच्या वतीनेही अभ्यासावर भर दिला जात आहे.

ऑनलाईनच्या माध्यमातून शंकाचे निरसन होत नसल्याची ओरड आहे. खासगी शाळांच्या वतीने विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करुन घेतली जात आहे.

कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले जात आहेत.

खेडेगाव - कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे पहिली ते चौथी तसेच आठवीपर्यंतची मुले आर्थिक अडचणीमुळे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत.

गावात नेटवर्किंगचा अडथळा तसेच सोयी-सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शाळा सुरु होतील तेव्हाच मुले अभ्यास करायला लागतील अशी पालकांना आशा आहे.