निलंग्यातील एकही घर नळ योजनेपासून वंचित राहणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:46 IST2020-12-11T04:46:09+5:302020-12-11T04:46:09+5:30

निलंगा : शहरात नवीन एकूण ६ हजार ६०० नळजोडणी देण्यात येणार असून एकही घर या पाणीपुरवठा योजनेपासून वंचित ...

No house in Nilanga will be deprived of plumbing scheme | निलंग्यातील एकही घर नळ योजनेपासून वंचित राहणार नाही

निलंग्यातील एकही घर नळ योजनेपासून वंचित राहणार नाही

निलंगा : शहरात नवीन एकूण ६ हजार ६०० नळजोडणी देण्यात येणार असून एकही घर या पाणीपुरवठा योजनेपासून वंचित राहणार नाही, याची पूर्ण दक्षता घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिली.

शहरातील पाणीपुरवठा वितरण विभागाची अरविंद पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज कोळळे, मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील, सभापती सय्यद इरफान, शरद पेटकर, पिंटू पाटील, पालिकेचे अभियंता कैलास वारद आदी उपस्थित होते.

शहरातील १५ लाख क्षमतेच्या दोन नवीन जलकुंभाची अरविंद पाटील निलंगेकर यांनी पाहणी करून पूर्वीच्या दहा लाख क्षमतेच्या जलकुंभांचीही पाहणी केली. त्यानंतर शहरातील पांचाळ कॉलनीतील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लक्ष्मणराव धुमाळ यांच्या घरी नवीन पाणीपुरवठ्याची जोडणी देण्यात आली. मीटर बसविताना प्रत्यक्ष उपस्थित राहून मीटरबाबतची माहिती निलंगेकर यांनी स्वतः नागरिकांना दिली.

२४ तास होणार पाणीपुरवठा...

नगराध्यक्ष शिंगाडे म्हणाले, ही योजना चालू झाल्यानंतर नगरपालिकेच्या बोअरची आवश्यकता भासणार नसल्यामुळे ते सर्व बोअर बंद करण्यात येणार आहेत. पाणीपुरवठा योजना २६ जानेवारीपर्यंत चालू करून प्रत्यक्ष नागरिकांच्या घरांत पाणीपुरवठा केला जाईल. २४ तास पाणीपुरवठा करणारी व क वर्गातील नगरपालिका असलेली मराठवाड्यातील ही पहिलीच असल्याचे अरविंद पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

Web Title: No house in Nilanga will be deprived of plumbing scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.