गणेशवाडीच्या उपसरपंचाविरूद्धचा अविश्वास ठराव बारगळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST2021-03-06T04:19:25+5:302021-03-06T04:19:25+5:30
तालुक्यातील गणेशवाडी येथील सरपंच अपात्र ठरल्यानंतर उपसरपंच वत्सलाबाई नारायणपुरे यांच्याकडे सरपंचाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. परंतु, वत्सलाबाई नारायणपुरे या ...

गणेशवाडीच्या उपसरपंचाविरूद्धचा अविश्वास ठराव बारगळला
तालुक्यातील गणेशवाडी येथील सरपंच अपात्र ठरल्यानंतर उपसरपंच वत्सलाबाई नारायणपुरे यांच्याकडे सरपंचाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. परंतु, वत्सलाबाई नारायणपुरे या इतर ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज करीत असल्याचा आरोप करून त्यांच्याविरोधात प्रभाकर साबदे, विठ्ठल जावळे, विजयाबाई गाते, मीना गुम्मे, सचिन छपरावळे या पाच सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यामुळे शुक्रवारी दुपारी गणेशवाडीच्या ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार अतुल जटाळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. विशेष सभेस उपस्थित राहण्यासाठी नारायणपुरे यांच्यासह पाच जणांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. परंतु, ऐनवेळी ६ पैकी ३ सदस्य गैरहजर राहिल्यामुळे अविश्वास ठराव बारगळला असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी निवडणूक विभागाचे लिपीक कार्लेकर यांचीही उपस्थिती होती.