नऊ गावांचा कारभार नव्या कारभाऱ्यांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:34 IST2021-02-06T04:34:09+5:302021-02-06T04:34:09+5:30
तालुक्यातील साकोळ, येरोळ, डिगोळ, सुमठाणा, बोळेगाव (बु.), धामणगाव, चामरगा, कारेवाडी, तळेगाव (दे.), शेंद, कानेगाव, तिपराळ, सांगवी घुग्गी, बिबराळ, ...

नऊ गावांचा कारभार नव्या कारभाऱ्यांकडे
तालुक्यातील साकोळ, येरोळ, डिगोळ, सुमठाणा, बोळेगाव (बु.), धामणगाव, चामरगा, कारेवाडी, तळेगाव (दे.), शेंद, कानेगाव, तिपराळ, सांगवी घुग्गी, बिबराळ, होनमाळ, हालकी, डोंगरगाव (बो.), उमरदरा, कांबळगा, हिप्पळगाव, शिवपूर, लक्कड जवळगा, थेरगाव, जोगाळा, भिंगोली, कळमगाव, अकंकुलगा (स.) अशा २७ गावांत निवडणुका झाल्या आहेत. गुरुवारपासून सरपंच, उपसरपंच निवडीस सुरुवात झाली.
तालुक्यातील साकोळच्या सरपंचपदी कमलाकर मादळे, उपसरपंच राजकुमार पाटील, शेंदच्या सरपंचपदी वैशाली परबत माने, उपसरपंच- महेश पाटील, बोळेगाव (बु.)च्या सरपंचपदी अर्चना परमेश्वर गौंड, उपसरपंच- संजय बोलंकर, हिप्पळगावच्या सरपंचपदी ज्ञानोबा मोगले, उपसरपंच सीताबाई सुधाकर माने, तळेगाव (दे.)च्या सरपंचपदी कांताबाई दत्तात्रय कांबळे, उपसरपंच- पंडित शिंदे, जोगाळाच्या सरपंचपदी निर्मला माने, उपसरपंच-इंद्रजित माने, सुमठाणाच्या सरपंचपदी उत्तम बिरादार, उपसरपंच निर्मलाबाई बाबूराव वाडकर, उमरदराच्या सरपंचपदी गायत्री राम नलावडे, उपसरपंच व्यंकट नरसिंग ढोपरे, होनमाळच्या सरपंचपदी किशोर हारणे, उपसरपंच सुप्रिया तिरुपती शिंदे यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर सरपंच, उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला.