निलंग्यात रंगला सर्वपक्षीय राजकीय खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST2021-08-14T04:24:57+5:302021-08-14T04:24:57+5:30
अध्यक्षस्थानी टी.टी. माने होते. यावेळी पालकमंत्री अमित देशमुख, माजी आ. पाशा पटेल, आ. अभिमन्यू पवार, आ. विक्रम काळे, काँग्रेसचे ...

निलंग्यात रंगला सर्वपक्षीय राजकीय खेळ
अध्यक्षस्थानी टी.टी. माने होते. यावेळी पालकमंत्री अमित देशमुख, माजी आ. पाशा पटेल, आ. अभिमन्यू पवार, आ. विक्रम काळे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, माजी आ. विनायकराव पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, अभय साळुंके, शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, लिंबन महाराज रेशमे, उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, महिला संघटक शोभाताई बेंजरगे, माजी जि.प. अध्यक्ष पंडित धुमाळ, विजयकुमार पाटील, ईश्वर पाटील, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते
आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात अजित माने यांनी राजकीय आकस बाजूला ठेऊन एकत्रित येणे हे लातूरच्या मातीचा गुण आहे, असे सांगितल्यानंतर प्रत्येक वक्त्यांनी हा कार्यक्रम अराजकीय आहे असे म्हणत राजकारणाची झालर चढविली. कार्यक्रम अर्ध्यावर आल्यानंतर भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर हे उपस्थित झाले. सत्कार स्वीकारून तात्काळ भाषण करीत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्स आहे म्हणून निघून गेले. त्यांच्या वाक्यावर पालकमंत्री अमित देशमुख यांनी आ. अभिमन्यू पवार यांच्याकडे अंगुली निर्देश करीत म्हणाले, पूर्वी देवेंद्र फडणवीस यांची अभिमन्यू पवार यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्स व्हायची. आता ती जबाबदारी प्रदेश सचिवाकडे गेली, असे म्हणताच सभागृहात हशा पिकाला. काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित धुमाळ यांना आ. विक्रम काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश दिला. त्याचेही आम्ही स्वागत करू. ते शिवसेनेत अथवा अन्य पक्षात गेले असते तर आम्हाला आनंदच होता. मात्र भाजपात गेले असते तर दुःख झाले असते असेही ते म्हणाले.
यावेळी आ. अभिमन्यू पवार म्हणाले, अजितराव, आपली कन्या अमेरिकेला शिक्षणासाठी जात आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मात्र तुम्ही घरीच थांबा (भाजपात) हे आपल्यासाठी हिताचे आहे, असे म्हटल्यावर अजित माने यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला सभागृहात उधाण आले.
माजी आ. पाशा पटेल म्हणाले, अजितराव दिसायला लहान असले तरी आजच्या अराजकीय कार्यक्रमातून जिल्ह्याच्या राजकारणाचा मोठा खेळ साधला असल्याचे म्हणताच सभागृहात पुन्हा हशा पिकला.
पालकमंत्री अमित देशमुख पक्षाच्या कुळ आणि मुळावर बोलताना आ. अभिमन्यू पवार वगळता मंचावरील सर्व मान्यवर एकाच कुळातील असल्याचे सांगिताच पुन्हा हशा पिकला. निलंग्यातील या कार्यक्रमाची राजकीय चर्चा जोरदार रंगली. यावेळी तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्ता शाहीर, सूत्रसंचालन संजय जेवरीकर यांनी केले. आभार पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने यांनी मानले. कार्यक्रमास काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना आदींसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.