निलंगा-सिंदखेड-चांदाेरी रस्त्याची चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:18 IST2021-03-15T04:18:41+5:302021-03-15T04:18:41+5:30
निलंगा येथून पेठमार्ग सिंदखेड जाणारा हा रस्ता महत्त्वाचा मार्ग आहे. त्याची सध्या चाळणी झाली आहे. रस्त्यावरून वाहने चालविणे माेठ्या ...

निलंगा-सिंदखेड-चांदाेरी रस्त्याची चाळणी
निलंगा येथून पेठमार्ग सिंदखेड जाणारा हा रस्ता महत्त्वाचा मार्ग आहे. त्याची सध्या चाळणी झाली आहे. रस्त्यावरून वाहने चालविणे माेठ्या जिकिरीचे झाले आहे. त्याचबराेबर हा मार्ग सिंदखेड, गुंजरगा, येळणूर, चांदोरी गावाला जोडले जातात. निलंगा ते चांदोरी सिंदखेड मार्ग हे अंतर १४ किलोमीटरचे अंतर आहे. मात्र, हा रस्ता खराब आहे म्हणून भुतमुगळी मार्गे चांदोरी हे अंतर २७ किलोमीटरचे आहे. त्यासाठी हा सिंदखेड रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे. चांदोरी येथील ग्रामस्थांना निलंगा येथे जाण्यासाठी हा रस्ता खराब आहे. परिणामी, उस्तुरी, भुतमुगळी मार्गे निलंगा गाठावे लागते. त्यामुळे वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींचा अपव्यय होत आहे. बाजारपेठेसाठी कासारसिरसी येथे जावे लागते. चांदुरी ग्रामस्थांसाठी निलंगा हे सोयीची बाजारपेठ आहे. निलंगा येथे आल्यानंतर बाजारहाट आणि प्रशासकीय कामे असे दोन्ही उरकता येते. त्यासाठी सिंदखेड रस्ता तातडीने दुरुस्त करावा, या मार्गावरील चांदोरी, गुंजारगा, येळणूर, सिंदखेड ग्रामस्थांच्या अडचण दूर कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. विशेष म्हणजे ही गावे औसा मतदारसंघात आहेत. त्यांना प्रशासकीय कामासाठी निलंगा येथे यावे लागते. त्यासाठी हा रस्ता होणे गरजेचे आहे. प्रशासनाने याची दखल घेतली नाही, रस्ता तातडीने नाही केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही या चार गावांतील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
हा रस्ता २०१३ मध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजना अंतर्गत करण्यात आला हाेता. त्यानंतर या रस्त्यावर डागडुजीही करण्यात आली नाही, असे चांदाेरीचे सरपंच विजय सोळुंके यांनी सांगितले.