शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवा पायंडा : हळदी- कुंकवासाठी विधवा महिलांनाही दिला मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 18:47 IST

हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमात सुवासिनींनाच मान देण्याची प्रथा आहे़ परंतु, निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) येथील महिलांनी ही जूनी प्रथा मोडित काढली आहे. मकर संक्रातीनिमित्तच्या हळदी- कुंकू कार्यक्रमास विधवा महिलांनाही मान देत नवा पायंडा घालण्याबरोबर सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय सुरु केला आहे.

 - माधव शिंदे लातूर - हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमात सुवासिनींनाच मान देण्याची प्रथा आहे़ परंतु, निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) येथील महिलांनी ही जूनी प्रथा मोडित काढली आहे. मकर संक्रातीनिमित्तच्या हळदी- कुंकू कार्यक्रमास विधवा महिलांनाही मान देत नवा पायंडा घालण्याबरोबर सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय सुरु केला आहे.आनंदवाडी (गौर) येथील विठ्ठल मंदिरात मकर संक्रातीनिमित्त हळदी- कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ या कार्यक्रमासाठी आनंदवाडी व गौर या दोन्ही गावातील सुवासिनींसह विधवा महिलांना बोलाविण्यात आले होते़ उपस्थित महिलांनी एकमेकांना तीळगुळ देऊन गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या़ त्याचबरोबर उर्वरित आयुष्य एकमेकींसोबत राहून एकमेकींना सामाजिक आधार देण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी ग्रामविकास संकल्पनेतून गावातच निर्माण केलेले  केमिकल विरहित होळीचे रंग व दंतमंजन वाण म्हणून भेट देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच शोभा कासले होत्या़ यावेळी आशाताई सनगले, रुक्मिणबाई सगर, विजयमाला पगडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी राधिका चामे, सुवर्णा चामे, संगीता चवरे, अयोध्या चामे यांनी आपले मनोगत व्यक्त केले़ विधवाचे जीवन कोणाच्या वाट्याला येईल, हे सांगता येत नाही़ मग या महिला कुठल्या आधारावर जगायच्या हा मोठा प्रश्न आहे़ आता यापुढे आपण सर्वजण एकमेकींच्या सुख- दु:खात सहभागी होत सहकार्य करु, असे मनोगतात महिलांनी सांगितले.प्रास्ताविक तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षा मीरा सगर यांनी तर सूत्रसंचालन गयाताई सोनटक्के यांनी केले. आभार वर्षा चवरे यांनी  मानले़ यशस्वीतेसाठी कमलताई चवरे, माया चवरे यांच्यासह गावातील महिलांनी परिश्रम घेतले. आता महिलांमध्ये होणार नाही भेदभावयावेळी महिलांनी सर्वानुमते चार ठराव मंजूर केले़ त्यात गावातील विधवा महिलांबाबत कसल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही़ गावातील प्रत्येक शुभकार्यात समान संधी देण्यात येईल़ तसेच त्यांना योग्य त्या स्वरुपात आधार देण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि त्यासाठी आम्ही वचनबध्द राहणार आहोत़ जर कुणावरही घरगुती अत्याचार होत असतील तर  तिच्या पाठीशी गावातील सर्व महिला शक्ती उभी राहील, असे ठराव मंजूर करण्यात आले़

टॅग्स :laturलातूरMaharashtraमहाराष्ट्र