लातूर : राज्यातील नामांकित शिक्षण संस्था असा लौकिक असणाऱ्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी माजी खा. डॉ. गोपाळराव पाटील यांची तर उद्योजक बी.बी. ठोंबरे यांची सचिवपदी निवड झाली आहे.
संस्थेच्या कार्यकारी मंडळाची बैठक सोमवारी राजर्षी शाहू महाविद्यालयातील संस्था कार्यालयात झाली. यावेळी उपाध्यक्षपदी डॉ. अजय जाधव तर सहसचिवपदी डॉ. शिवाजीराव सूर्यवंशी तर उद्धवराव पाटील यांची निवड करण्यात आली. तत्पूर्वी ८ फेब्रुवारी रोजी संस्थेची रीतसर मतदानाद्वारे निवड प्रक्रिया पार पडली.
यामध्ये १५ जणांची कार्यकारी मंडळावर झाली असून, त्यात डॉ. गोपाळराव पाटील, बी.बी. ठोंबरे, डॉ. अजय जाधव, डॉ. शिवाजीराव सूर्यवंशी, उद्धवराव पाटील, प्राचार्य रावसाहेब कावळे, सच्चिदानंद पाटील, शिवाजीराव पाटील, विजयाताई पाटील, शुभांगी सूर्यवंशी-काळे, धर्मराज हल्लाळे, शिवाजी भोसले, अमर देशमुख, प्रकाश देशमुख, शामराव पाटील यांचा समावेश आहे.
संस्थेचा लौकिक वृद्धिंगत होईल
पदाधिकारी निवडीनंतर संस्थेचे माजी सचिव प्राचार्य अनिरूद्ध जाधव यांनी पदभार नूतन सचिव बी.बी. ठोंबरे यांच्याकडे सुपूर्द करून नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे स्वागत केले. याप्रसंगी अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील व सचिव बी.बी. ठोंबरे यांनी भावना व्यक्त करताना विद्यार्थी हित, शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखत शिक्षक, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणारी धोरणे कायम राहतील. संस्थेचा लौकिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
Web Summary : Dr. Gopalrao Patil is the new president of Shiv Chhatrapati Sanstha. B.B. Thombare was selected as secretary. The committee aims to uphold educational quality and support staff, fostering institutional growth, officials said.
Web Summary : डॉ. गोपालराव पाटिल शिव छत्रपति संस्था के नए अध्यक्ष बने। बी.बी. ठोंबरे सचिव चुने गए। समिति का लक्ष्य शैक्षिक गुणवत्ता बनाए रखना और कर्मचारियों का समर्थन करना है, जिससे संस्थागत विकास को बढ़ावा मिले।