नवीन शैक्षणिक धोरण संभ्रमावस्था निर्माण करणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:18 IST2021-02-15T04:18:46+5:302021-02-15T04:18:46+5:30

निलंगा येथे मराठा सेवा संघाच्या वतीने आयाेजित एक दिवसीय परिसंवाद व सावित्री जन्मोत्सव स्पर्धा बक्षीस वितरण साेहळ्यात ते रविवारी ...

New educational policies creating confusion | नवीन शैक्षणिक धोरण संभ्रमावस्था निर्माण करणारे

नवीन शैक्षणिक धोरण संभ्रमावस्था निर्माण करणारे

निलंगा येथे मराठा सेवा संघाच्या वतीने आयाेजित एक दिवसीय परिसंवाद व सावित्री जन्मोत्सव स्पर्धा बक्षीस वितरण साेहळ्यात ते रविवारी बाेलत हाेते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य दिलीप धुमाळ तर मंचावर प्रमुख पाहुणे अरविंद पाटील निलंगेकर, नितीन सावंत, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील नावडे, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, प्राचार्य डॉ .भागवत पौळ, प्रा. दयानंद चोपणे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम, जिल्हा कार्याध्यक्ष एम.एम. जाधव, आम्रपाली सूरवंशी, रंजना चव्हाण यांची उपस्थिती हाेती. डॉ.डी.एन.मोरे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात कॅम्पस स्कूल ही संकल्पना समोर येत आहे. मात्र ही संकल्पना सर्वसामान्यांना परवडणारी नाही. यातील चुकीच्या गोष्टीचा विरोध केलाच पाहिजे. देशातील ५० हजार हायस्कूलपैकी ३५ हजार संस्था शैक्षणिक महाविद्यालय बंद करायचे आणि केवळ १५ हजार संस्थेलाच क्लस्टर हायर एज्युकेशनच्या गोंडस नावाखाली परवानगी द्यायची, एका महाविद्यालयाला तीन हजार विद्यार्थी संख्येची अट ठेवणे आणि परिसरातील इतर कॉलेज बंद करणे, यातून शैक्षणिक गळतीचे प्रमाण वाढणार असल्याची चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ३९ हजार ३९१ महाविद्यालयांपैकी ७७.८ टक्के खाजगी महाविद्यालये आहेत. त्यापैकी ६४.५ टक्के हे खाजगी विना अनुदानित आहेत. तर केवळ १३.५ टक्के अनुदानित महाविद्यालये अस्तित्वात आहेत. स्वायत्तता तत्वावर ही महाविद्यालये सुरू हाेणार असल्याचे या बिलात नोंद केले आहे. या सर्व प्रकारांमध्ये ७४ टक्के विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहाच्या बाहेर असल्याचे मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून आकडेवारी उपलब्ध झाली आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी जिजाऊ सावित्री व्याख्यानमाला पारितोषिक वितरण करण्यात आले. रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व आनंद नगरीतील स्टॉल या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रा.डॉ.हंसराज भोसले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, गणेश गायकवाड तर आभार उत्तम शेळके यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. उद्धव जाधव, विनोद सोनवणे, सुबोध गाडीवान, आनंद जाधव, आर.के. नेलवाडे, डी.एन. बरमदे, कुमोद लोभे, डॉ. गोपाळ मोघे, भास्कर यादव, अजित लोभे, डॉ. नितीन चांदोरे, अर्चना मोरे, नम्रता हाडोळे, ज्ञानेश्वर बरमदे, डी.बी. गुंडूरे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: New educational policies creating confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.