आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST2021-09-09T04:25:29+5:302021-09-09T04:25:29+5:30

जळकोट : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र यावे, असे आवाहन ...

Neglect of farmers by the alliance government | आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

जळकोट : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र यावे, असे आवाहन माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी केले.

शहरातील भाजप कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष अरविंद नागरगोजे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष राम एकलारे, बालाजी तिडके, बालाजी केंद्रे, शिवाजी डुकरे, बालाजी मालुसरे, रत्नाकर गुट्टे, बालाजी सिंदगीकर, भाऊराव कांबळे, जगन्नाथ मैलारी, दत्ता वंजे, नीलेश गडकर, अहमदपूरचे तालुकाध्यक्ष दत्ता गोरे, ॲड. सुधाकर जगताप, रामकिसन पवार, दयानंद रेड्डी, अजित गुट्टे, रमेश चोले, बाबुराव गुट्टे, अरुण केंद्रे, उत्तमराव जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार केंद्रे म्हणाले, भाजप पक्षवाढीसाठी तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे. आगामी नगर पंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे आवश्यक आहे. तहसीलकडे जाणारा रस्ता अतिशय खराब झाला असून, जिल्हा परिषदेमार्फत त्याची दुरूस्ती करण्यासाठी मी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.

Web Title: Neglect of farmers by the alliance government