गरज सराे अन् वैद्य मराे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST2021-09-15T04:24:47+5:302021-09-15T04:24:47+5:30

काेराेना रुग्णांचा आलेख वाढला त्यावेळी रुग्णांजवळ काेणीही जात नव्हते, अशावेळी याच कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली; मात्र आता त्यांना राष्ट्रीय आराेग्य ...

Needless to say, the doctor died ... | गरज सराे अन् वैद्य मराे...

गरज सराे अन् वैद्य मराे...

काेराेना रुग्णांचा आलेख वाढला त्यावेळी रुग्णांजवळ काेणीही जात नव्हते, अशावेळी याच कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली; मात्र आता त्यांना राष्ट्रीय आराेग्य अभियानाने वाऱ्यावर साेडले आहे. लातूर जिल्ह्यात ७०० कर्मचारी आता बेराेजगार झाले आहेत. यातील डाॅक्टर व प्रयाेगशाळा तंत्रज्ञ असलेल्या काहींना खासगी काम मिळाले आहे; परंतु अनेकांना राेजगारासाठी भटकंती करावी लागत आहे.

कमी केलेले कर्मचारी...

डाॅक्टर - १००

वर्ग ४ - १०७

डाटा ऑपरेटर - २५

टेक्निशिअन - २७

स्टाप नर्स - १७५

वाॅर्डबाॅय - १२६

शिपाई - ३४

प्रयाेगशाळा तंत्रज्ञ - २७

लिपिक - १०

इतर - ६९

आपत्ती व्यवस्थापनाकडे प्रस्ताव...

संभाव्य तिसरी लाट आली आणि मनुष्यबळाची गरज लागली तर आपत्ती व्यवस्थापनमधून निधी उपलब्ध केला जाणार आहे. तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला असून, याच कर्मचाऱ्यांना गरज लागली तर पुन्हा कामावर घेतले जाईल, सध्या राष्ट्रीय आराेग्य मिशनकडे पैसे नाहीत. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे.

- डाॅ. एल.एस. देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक, लातूर

काेराेना काळात रुग्णावर उपचार करण्यास कायम सेवेतील कर्मचारी तयार नव्हते. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली. आता गरज संपल्यानंतर आम्हाला कामावरुन कमी केले आहे. आमच्या उपजीविकेचा विचार शासनाने करायला हवा हाेता. - ज्ञानेश्वर काळे, कंत्राटी कर्मचारी

Web Title: Needless to say, the doctor died ...