गावपातळीवर समाजप्रबोधनाचे कार्य करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST2021-09-13T04:19:17+5:302021-09-13T04:19:17+5:30
तालुक्यातील अंबुलगा (मे) येथे व्यंकटेश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ॲड. तिरुपती शिंदे यांच्या पुढाकारातून आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व कोविड ...

गावपातळीवर समाजप्रबोधनाचे कार्य करण्याची गरज
तालुक्यातील अंबुलगा (मे) येथे व्यंकटेश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ॲड. तिरुपती शिंदे यांच्या पुढाकारातून आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व कोविड काळात अहोरात्र जनतेच्या सेवेत असलेल्या मान्यवरांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा. शिवाजीराव शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.चे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, माजी सभापती अजित माने, संगांयो सदस्य सुरेंद्र धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर, प्रणिता गायकवाड, डॉ. लालासाहेब देशमुख, डॉ उद्धव जाधव, सचिन बसूदे , एम.एम.जाधव, महेश देशमुख, रमेश जाधव, ॲड. ओम माने, ॲड. संदीप मोरे यांची उपस्थिती होती.
तहसीलदार जाधव म्हणाले, गाव शंभर टक्के लसीकरण करा, यातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत येईल. तिसरी लाट रोखण्यासाठी आपल्याला लसीकरणाचा खूप मोठा फायदा आहे. यावेळी सर्वरोग निदान शिबिरात जवळपास २०० जणांची तपासणी व उपचार करण्यात आले तर उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाच्यावतीने ६० जणांच्या डोळ्याची तपासणी करण्यात आली. त्यातील आठ जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. यावेळी रक्तदान शिबिरही घेण्यात आले. यावेळी दिलीप धुमाळ, सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. हंसराज भोसले, एस.एम. शिरमाळे, आर. के. नेलवाडे, दास साळुंके, सुधीर लखनगावे, प्रमोद कदम, रमेश मोगरगे, बाळू सोमाणी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक ॲड. तिरुपती शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन उत्तम शेळके, दत्तात्रय दापके यांनी केले.
यांचा झाला सन्मान...
कोरोना काळात सामाजिक कार्य केलेल्या संस्था यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यात आक्का फाऊंडेशन, जिवलग फाऊंडेशन, मराठा सेवा संघ, सर्वोत्तम चॅरिटेबल ट्रस्ट यांना व तहसीलदार गणेश जाधव, डॉ. लालासाहेब देशमुख, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, डॉ. उध्दव जाधव, डॉ. बसुदे, कुमोद लोभे, तलाठी सोनिया उमडगे, ग्रामसेवक विकास वैराळे, ॲड. गोपाळ इंगळे, ॲड. जयशील धुमाळ, किशोर जाधव, अमोल चौधरी, रमेश लांबोटे तसेच या भागातील आशाताई, आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी, निलंगा तालुक्यातील पत्रकारांनाही सन्मानित करण्यात आले.