उद्योगासाठी सकारात्मक विचारांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:18 IST2021-03-28T04:18:36+5:302021-03-28T04:18:36+5:30
उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या वतीने कोरोना लसनिर्मिती, उत्पादन आणि वितरणातील योगदानाबद्दल डॉ. विनोदकुमार पाटील यांचा सत्कार करण्यात ...

उद्योगासाठी सकारात्मक विचारांची गरज
उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या वतीने कोरोना लसनिर्मिती, उत्पादन आणि वितरणातील योगदानाबद्दल डॉ. विनोदकुमार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते. मंचावर संस्थासचिव प्रा. मनोहर पटवारी, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रमेशअण्णा अंबरखाने, प्राचार्य आर.आर. तांबोळी, उपप्राचार्य प्रा. आर.एन. जाधव उपस्थित हाेते. यावेळी उद्योजक रमेशअण्णा अंबरखाने यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःमधील न्यूनगंड दूर करून भविष्यकालीन संधीचे सोने करावे, असे सुचविले. सचिव प्रा.मनोहर पटवारी म्हणाले, जगाच्या विकासात भारत कुठे आहे आणि उदयगिरी महाविद्यालयाचा त्यात काय वाटा आहे, याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी तथा शास्त्रज्ञ डॉ. विनोदकुमार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. आपण सर्वांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले. नागराळकर म्हणाले, सामाजिक बांधिलकी जोपासणारे विद्यार्थी घडविणे हा आपल्या शैक्षणिक संस्थेचा मुख्य उद्देश आहे. डॉ. विनोदकुमार पाटील हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. जीवनाची दिशा बदलवणारे विचार विद्यार्थ्यांना ऐकायला मिळावे, हा कार्यक्रमामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःमधील न्यूनगंड दूर केल्याशिवाय विकास होणार नाही. त्यामुळे व्यक्त व्हायला शिका, असे आवाहन केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. तांबोळी यांनी तर पाहुण्यांचा परिचय डॉ. मल्लेश झुंगा स्वामी यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. गौरव जेवळीकर तर आभार प्रा. प्रवीण जाहूरे यांनी मानले.