न्यायालयात मराठी भाषेचा वापर वाढण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:22 IST2021-01-16T04:22:49+5:302021-01-16T04:22:49+5:30
तालुका विधी सेवा समिती व येथील विधीज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

न्यायालयात मराठी भाषेचा वापर वाढण्याची गरज
तालुका विधी सेवा समिती व येथील विधीज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते अध्यक्षीय समारोपात बोलत होते. यावेळी कवी प्रा. डॉ. सय्यद अकबर लाला, सह दिवाणी न्या. श्याम एस. तोंडचिरे, दुसरे सह दिवाणी न्या. अतुल अरुण उत्पात, वकील संघाचे सचिव ॲड. सुधाकर जगताप, उपाध्यक्ष ॲड. एजास शेख (बक्षी) यांची उपस्थिती होती.
यावेळी ॲड. वसंतराव फड, ॲड. डी.एन. ईप्पर, ॲड. एस.आर. केंद्रे, भास्कर मुंढे, ॲड. अन्वर सय्यद, ॲड. मुसणे, ॲड. सोपान शिवणे, ॲड. सुहास भ. चाटे, ॲड. महेश पाटील, व्ही.ए. सोनकांबळे, ॲड. सुहास देशमुख, ॲड. ईरफान चौधरी, ॲड. सुशील कांबळे, ॲड. प्रशांत येरे, ॲड. जी.बी. डुरे, ॲड. अनिल नवटक्के, सुप्रिया कुलकर्णी, नेहा शिंदे, शितल सुरवसे, सज्जाद.जे. सय्यद, विकास जि. कराड यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन ॲड. महाजन एस. कांबळे यांनी केले. आभार ॲड. रोहिनी देशमुख यांनी मानले.
भाषेचे संवर्धन आवश्यक...
न्या. ठाकरे म्हणाले, प्रत्येक भाषांवर एकमेकांचा प्रभाव दिसून येतो. माणसाला समजणाऱ्या व सोप्या भाषेत व्यवहार होणे आवश्यक आहे. भाषा ही संभाषणाचे माध्यम आहे. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.