गाव विकासासाठी समन्वयाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:19 IST2021-03-14T04:19:20+5:302021-03-14T04:19:20+5:30
: गावच्या विकासासाठी शासन आणि प्रशासनात समन्वय असण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी ...

गाव विकासासाठी समन्वयाची गरज
: गावच्या विकासासाठी शासन आणि प्रशासनात समन्वय असण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी करडखेल येथे केले. करडखेल येथे आयाेजित नूतन ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सत्कार साेहळ्यात ते बाेलत हाेते. जिल्हा परिषद अध्यक्ष केंद्रे म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध याेजना गावपातळीपर्यंत न्यायाच्या असतील, त्यातील गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर लाेकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असण्याची गरज आहे. ताे असेल तर गावचा नक्कीच विकास हाेइल. यावेळी लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील, जिल्हा परिषद सदस्य शंकर राेडगे, तुळशीराम बेंबडे, प्रल्हाद गुरुडे, दत्ता बुरले यांच्यासह नूतन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित हाेते.