बदत्या शिक्षण पद्धतीचा स्वीकार करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST2021-03-21T04:18:44+5:302021-03-21T04:18:44+5:30
उदगीर तालुक्यातील हकनकवाडी येथील सत्यशोधक पर्यावरण विकास विद्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री बनसोडे बोलत होते. अध्यक्षस्थानी ...

बदत्या शिक्षण पद्धतीचा स्वीकार करण्याची गरज
उदगीर तालुक्यातील हकनकवाडी येथील सत्यशोधक पर्यावरण विकास विद्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री बनसोडे बोलत होते.
अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी उपस्थित होते. उद्घाटक कांतादेवी व्यंकटेश चौधरी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष देवीदास कांबळे, गुरुमावली मुक्तादेवी, नगरसेवक श्रीरंग कांबळे, दयानंद शिंदे, नीळकंठ बिरादार, उद्योजक कमलेश पेठे, श्याम डावळे, रोहिदास कुंडगीर, केंद्रप्रमुख प्रतिभा मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यमंत्री बनसाेडे म्हणाले, उदगीर-जळकोट मतदारसंघातील जनतेने सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. राज्याचा मंत्री म्हणून काम करताना मतदारसंघाचा चौफेर विकास करणे, हेच माझे कर्तव्य आहे. अनेक विकासाचे प्रकल्प या मातीत भविष्यात येणार आहेत. त्याबरोबरच शिक्षण आणि पर्यावरण संरक्षण यावरही आपण काम करणार आहोत. शिक्षणाने माणूस विकसित होत असतो. म्हणून व्यंकटेश चौधरी यांनी ग्रामीण भागात शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात केलेल्या कार्याचे कौतुक करीत, या कामाला अधिक गती मिळावी म्हणून आपण १५ लाख रुपयांचा निधी जाहीर करीत आहोत, असे सांगितले. प्रास्ताविक प्रा. एम.व्ही. स्वामी यांनी, तर सूत्रसंचालन रसूल पठाण यांनी केले. आभार प्रा. के. डी. मुडपे यांनी मानले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक, विद्यार्थी-पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.