लातूर जिल्ह्याला ऑक्सिजनचा आवश्यक पुरवठा : पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:19 IST2021-04-22T04:19:29+5:302021-04-22T04:19:29+5:30
कोरोनाची ही दुसरी लाट येत्या काही दिवसांत आणि आठवड्यात कोणते रूप धारण करते, यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. ...

लातूर जिल्ह्याला ऑक्सिजनचा आवश्यक पुरवठा : पालकमंत्री
कोरोनाची ही दुसरी लाट येत्या काही दिवसांत आणि आठवड्यात कोणते रूप धारण करते, यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. औषधे व ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील, याचे नियोजन केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, स्वत:ला, आपल्या कुटुंबाला कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
ऑक्सिजनचा काटकसरीने वापर करावा
सध्याची परिस्थिती अभूतपूर्व आहे. त्यामुळे उपलब्ध होणारा ऑक्सिजन डॉक्टर मंडळींनी आवश्यकतेनुसार काटकसरीने वापरावा. ऑक्सिजनचा तुटवडा आहे ही वस्तुस्थिती स्वीकारावीच लागेल. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. त्यामुळे आवश्यक तेवढाच वापर करावा. काही ठिकाणी ऑक्सिजन वाया जात असल्याच्या घटना समोर आल्या. त्यामुळे असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी.