ग्रामीण रुग्णालय, कोविड सेंटरला आवश्यक साहित्य तातडीने देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:46+5:302021-04-21T04:19:46+5:30
येथील ग्रामीण रुग्णालय व बावची येथील कोविड केअर सेंटरला आ. धीरज देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच वैद्यकीय ...

ग्रामीण रुग्णालय, कोविड सेंटरला आवश्यक साहित्य तातडीने देऊ
येथील ग्रामीण रुग्णालय व बावची येथील कोविड केअर सेंटरला आ. धीरज देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच वैद्यकीय अधिकारी व रुग्णांशी संवाद साधला. यावेळ उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार राहुल पाटील, गटविकास अधिकारी मोहन अभंगे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद कर्नावट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायण देशमुख, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रमोद जाधव, संगायोचे अध्यक्ष गोविंद पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष मतीनअली सय्यद, नगरसेवक राम जोगदंड, डॉ. शेख, डॉ. तांदळे यांच्यासह आरोग्य, महसूल, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आ. धीरज देशमुख यांनी ग्रामीण रुग्णालय व बावची येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील कोविड केअर सेंटरला भेट देऊन येथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. रुग्णांशी संवाद साधून औषधे, जेवण या सुविधा वेळेवर मिळत आहेत की नाही, याची चौकशी केली. त्यानंतर तालुका प्रशासन, ग्रामीण रुग्णालय व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोविडसंदर्भात माहिती घेतली. तसेच काही सूचनाही केल्या.
खाटांसाठी प्रस्ताव दाखल करावा...
रेणापूर हे तालुक्याचे मुख्यालय आहे. ग्रामीण रुग्णालयात सध्या खाटा कमी पडत असल्याने येथे नवीन खाटांसाठी जागा उपलब्ध आहे का याची चौकशी केली. नवीन ट्रामा केअर, कोविड केअर सेंटर व अन्य हॉस्पिटल सुरू करण्यासाठी किमान शंभर ते दीडशे खाटांची उभारणी व्हावी. त्यासाठी तातडीने प्रस्ताव दाखल करावेत, अशा सूचना केल्या. तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना व प्रशासनास आमदार धीरज देशमुख यांनी केल्या.