इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादीची उपहासात्मक आनंदोत्सव रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:20 IST2021-03-05T04:20:13+5:302021-03-05T04:20:13+5:30
या रॅलीचा प्रारंभ शहरातील नांदेड रोडवरील पेट्रोलपंपापासून झाला. रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समीर शेख, कार्याध्यक्ष गजानन सताळकर, सेवा दलाचे ...

इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादीची उपहासात्मक आनंदोत्सव रॅली
या रॅलीचा प्रारंभ शहरातील नांदेड रोडवरील पेट्रोलपंपापासून झाला. रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समीर शेख, कार्याध्यक्ष गजानन सताळकर, सेवा दलाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस अजिम दायमी, खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष भरत चामले, शेख समद, प्रा. आर.जी. जाधव, धनराज बनसोडे, माजी नगरसेवक सय्यद मोईन, शफी हाशमी, शहर उपाध्यक्ष शंकर मुक्कावार, माधव उदगीरकर, राजकुमार गंडारे, अजहर मोमीन, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष संघशक्ती बलांडे, विजय भालेराव, शेषेराव भाकसखेडे, राहुल सोनवणे, प्रशांत मोरे, सगर बाळू, साजीद खुरेशी, मुसा पठाण, रऊफ थोडगे, सलिम सय्यद, सलिम हाशमी, अकरम जहागीरदार, सिद्धार्थ कांबळे, पप्पू कांबळे, अजय फेंगडे, शेख खाजा, खाजा पेटल, महिला शहराध्यक्ष दीपालीताई औटे, युवती तालुकाध्यक्ष पूजा चौहाण, शहराध्यक्ष ज्योती स्वामी, भारती सूर्यवंशी, हुसना बानू, सुस्मिता माने, स्वाती कांबळे, सयुक्ता बोडके, प्रीती किशन, फेरोज पठाण, युवराज जोमदे, अजय शेटकार, इम्रान शेख, सोनू जलसे, खिजर मोमीन, अरविंद गिलचे, नामदेव भोसले, दशरथ शिंदे, प्रदीप जोंधळे, प्रेम तोगरे, संपत कांबळे, राज ढोबळे, चरण कांबळे, रत्नदीप बलांडे, राहुल कांबळे, शुभम कांबळे, दीपक गायकवाड, संतोष जाधव, अक्षय कांबळे, बंटी शिंदे, तेजस नखाते, कुलदीप बोडके, प्रतीक बलांडे, आकाश माने, यशवंत कांबळे, गजानन खेडाळे, नागेश मुंडे, शुभम गायकवाड, सलीम शेख, जमीर शेख, जावेद शेख, गौसोद्दीन शेख, सोनू हाश्मी, जैद शेख, अमन तांबोळी, नासीर शेख, ईरशाद बाणीकार आदी सहभागी झाले होते.
केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध...
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने केलेली इंधन दरवाढ मागे घेण्याची सर्वसामान्यांची माफक अपेक्षा; मात्र केंद्राने ‘अच्छे दिन’ आणल्याबद्दल! हे अनोखे आंदोलन करण्यात आले. रॅलीमध्ये बैलगाडीवर दुचाकी, रिकामे गॅस सिलिंडर ठेवण्यात आले होते. पेट्रोल पंपाला पुष्पहार घालण्यात आला. रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साखर वाटप करून झाला.