जळकोट : जळकोट येथे राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सत्यवान पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी ओबीसी विभागाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या बैठकीला राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण बतले, जितेंद्र आडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील, शहराध्यक्ष अशोक डांगे, युवक तालुकाध्यक्ष सत्यवान पाटील, धनंजय भ्रमण्णा उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी ओबीसीची तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यात राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या तालुकाध्यक्षपदी भिकाजी राठोड, कार्याध्यक्षपदी अक्षय बडगिरे, जिल्हा कार्यकारिणी उपाध्यक्षपदी संदीप यनाडले, सचिवपदी मोहन पवार, सरचिटणीसपदी परमेश्वर जोगपेटे, संघटन सचिवपदी राजीव राठोड, चिटणीसपदी दत्ता इंदोरे, जळकोट शहराध्यक्षपदी युनुस लालअहमद तांबोळी, तालुका उपाध्यक्षपदी मारोती पुट्टेवाड, सचिवपदी माधव तिलमलदार यांची निवड करुन नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीनंतर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण बतले यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन वाघमारे यांनी केले.
यावेळी शिवहार केंद्रे, बालाजी गट्टे, अनिल काळे, नागेश गट्टे, प्रशांत गित्ते, स्वप्नील राठोड, राहुल राठोड, माधव चव्हाण, शिवाजी राठोड आदी उपस्थित होते.