उदयगिरी महाविद्यालयात एनसीसी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:34 IST2021-02-18T04:34:32+5:302021-02-18T04:34:32+5:30
अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के होते. मंचावर कॅप्टन प्रा. डाॅ. अनिता शिंदे, लेफ्टनंट प्रा. डॉ. राम साबदे ...

उदयगिरी महाविद्यालयात एनसीसी शिबिर
अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के होते. मंचावर कॅप्टन प्रा. डाॅ. अनिता शिंदे, लेफ्टनंट प्रा. डॉ. राम साबदे लेफ्टनंट प्रा. वसंत पवार, केअर टेकर ऑफिसर प्रा. प्रशांत माने, सेकंड ऑफिसर बालाजी मुसकावाड, सुभेदार वीरेंद्र सिंग, हवलदार ललित सिंग, हवलदार राकेश कुमार, प्रा. प्रवीण जाहूरे यांची उपस्थिती होती. यावेळी सिंग यांनी सैन्यात अधिकारी होण्यासाठी पूर्वतयारी कशी करावी, तसेच एस.एस.बी. मुलाखतीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ.राजकुमार मस्के म्हणाले की, इच्छा तिथे मार्ग सापडतो. सैन्यदलाचे ध्येय समोर ठेवून छात्र सैनिकांनी परिश्रम घेतल्यास संधी प्राप्त होऊ शकतो. सूत्रसंचालन व आभार लेफ्टनंट डॉ. राम साबदे (एन.सी.सी.कंपनी कमांडर, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय) यांनी मानले.