उदयगिरीत गणित दिनी राष्ट्रीय प्रश्नोत्तर स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:20 IST2021-01-03T04:20:36+5:302021-01-03T04:20:36+5:30
या परीक्षेसाठी भारतातून एकूण १६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९६७ विद्यार्थी महाराष्ट्र, गुजरात ९३, तामिळनाडू ११७, ...

उदयगिरीत गणित दिनी राष्ट्रीय प्रश्नोत्तर स्पर्धा
या परीक्षेसाठी भारतातून एकूण १६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९६७ विद्यार्थी महाराष्ट्र, गुजरात ९३, तामिळनाडू ११७, उत्तराखंड ७५, पश्चिम बंगाल ४७ गोवा ३१, केरळा २९, पंजाब १९, बिहार २९, हरियाणा १० व इतर राज्यातील ११० विद्यार्थी ऑनलाईन सहभागी झाले होते. अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय विद्यार्थी शंकरा भाविक (एस.पी. कॉलेज, पुणे), रेडकर रोहित (गोवा विद्यापीठ, गोवा) आणि शर्मा प्रिया (उत्तरप्रदेश) यांनी मिळविला आहे. विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धा यशस्वीतेसाठी संयोजक डॉ. बी. डी. करंडे, प्रा. पी.पी. वाघमारे यांनी पुुढाका घेतला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहरराव पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, पदाधिकारी, प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर.के. मस्के, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. रमाकांत मध्वरे, सचिव डॉ. राहुल आलापुरे यांनी कौतुक केले आहे.