‘उदयगिरी’त राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन जाणीव जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:18 IST2021-03-28T04:18:33+5:302021-03-28T04:18:33+5:30
साधनव्यक्ती म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे वित्त अधिकारी डॉ. दत्ता खंदारे व पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ...

‘उदयगिरी’त राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन जाणीव जागृती
साधनव्यक्ती म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे वित्त अधिकारी डॉ. दत्ता खंदारे व पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, पुणे येथील डॉ. सुदर्शन बोबडे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. खंदारे यांनी पेटंटच्या विविध प्रकारांविषयी, त्याच्या नोंदणीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. बौद्धिक संपत्तीची नोंदणी करण्याची आवश्यकता का आहे, हेही सांगितले. डॉ. बोबडे म्हणाले, बौद्धिक संपदा नोंदणीची प्रक्रिया विविध प्रकार व त्यातील मजकूर क्षेत्र कल्पना यांची नोंद कशी करावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विविध राज्यांतील, विविध विद्यापीठांतील ३४० प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. समन्वयक म्हणून वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. बालाजी होकरणे यांनी काम पाहिले. प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी म्हणाले, बौद्धिक संपदेचे सध्याच्या जगामध्ये असलेल्या महत्त्वामुळे वाणिज्य शाखेने हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमासाठी समन्वयक डॉ. कमलाकर गव्हाणे, संयोजन सचिव. डॉ. एकनाथ कोरपकवाड, प्रा.डॉ. मंजुनाथ मानकरी, प्रा.डॉ. राहुल आलापुरे, प्रा.डॉ. संतोष मुळे, प्रा. संतोष घोंगडे, प्रा.डॉ. अनिल मुंडे, प्रा.डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार, प्रा. सदानंद आवाळे, प्रा. राहुल बिरादार यांनी पुढाकार घेतला.