अव्होपाचा सामाजिक सेवेचा नंदादीप पथदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:20 IST2021-03-17T04:20:10+5:302021-03-17T04:20:10+5:30

अध्यक्षस्थानी अव्होपाचे मावळते अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार होते तर मंचावर नूतन अध्यक्ष प्रा. सुनील वट्टमवार, विजय गबाळे, प्रा. ...

Nandadeep guide of Avhopa's social service | अव्होपाचा सामाजिक सेवेचा नंदादीप पथदर्शक

अव्होपाचा सामाजिक सेवेचा नंदादीप पथदर्शक

अध्यक्षस्थानी अव्होपाचे मावळते अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार होते तर मंचावर नूतन अध्यक्ष प्रा. सुनील वट्टमवार, विजय गबाळे, प्रा. संजय चन्नावार, बालाजी बुन्नावार यांची उपस्थिती होती. प्रा. डॉ. राजकुमार मस्के म्हणाले, प्रज्ञावंत समाज निर्मिती हे आजचे आव्हान असून, समर्पणाच्या भावनेतून कार्य करणारे संस्कारीत कार्यकर्ते हेच समाजाची संपत्ती आहेत. अव्होपाने सामाजिक सेवेचा मानदंड निर्माण केला आहे. सेवाकार्याचा हा पथ निश्चितच मार्गदर्शक असल्याचेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपात प्रा.डॉ. दीपक चिद्दरवार यांनी अव्होपाच्या सामाजिक कार्याची सूत्री सांगितली. अव्होपाचे नुतन अध्यक्ष प्रा. सुनील वट्टमवार यांनी अव्होपाच्या सामाजिक वाटचालीचे विश्लेषण करून आगामी रूपरेषा सांगितली. यावेळी प्रा.डॉ. मस्के यांनी नूतन पदाधिकारी व अध्यक्ष प्रा.सुनील वट्टमवार, उपाध्यक्ष प्रा. संजय चन्नावार, सचिव विजयकुमार गबाळे, सहसचिव महेश गादेवार, कोषाध्यक्ष बालाजी बुन्नावार, ॲड. बालाजी जगळपूरे, संजय पत्तेवार, अनिल मारमवार, डॉ. संगमेश्वर दाचावार, डॉ. उदय गुजलवार, धनंजय गुडसूरकर, देविदास पारसेवार, संतोष कोटगीरे, उल्हास मोरलवार, प्रा. संजय संगुळगे,

व्यंकटेश पारसेवार, संतोष मुर्के, बालाजी पत्तेवार, सुधाकर पंदीलवार, प्रा. राकेश पांपटीवार यांना शपथ दिली. सूत्रसंचालन विजय गबाळे यांनी तर आभार महेश गादेवार यांनी मानले.

Web Title: Nandadeep guide of Avhopa's social service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.