लोकशिक्षक म्हणून नामवाड गुरुजींनी कार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST2021-08-28T04:24:10+5:302021-08-28T04:24:10+5:30
येथील सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त शिक्षक केरबा नामवाड गुरुजी यांचा समाज बांधव, ग्रामस्थांच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते ...

लोकशिक्षक म्हणून नामवाड गुरुजींनी कार्य करावे
येथील सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त शिक्षक केरबा नामवाड गुरुजी यांचा समाज बांधव, ग्रामस्थांच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष किशन धुळशेट्टे होते. यावेळी प्राचार्य शिवाजीराव जवळगेकर, भाजपाचे जिल्हा चिटणीस सोमेश्वर सोप्पा, घोडके गुरुजी, नगरसेवक शिवानंद देशमुख, सांस्कृतिक साहित्य मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर, प्राचार्य दत्तात्रय हमपल्ले, प्राचार्य संपत शिंगाडे, दलित मित्र व्यंकटराव गवळे, मरसांगवीचे माजी सरपंच दाऊद बिरादार, उपनगराध्यक्षा रोहिणीताई केंद्रे, गोविंद भ्रमण्णा, नरसिंग डांगे, दत्तात्रय नामवाड, संग्राम नामवाड, माजी मुख्याधिकारी धोंडिराम नामवाड, राजकुमार नामवाड, किशोर नामवाड, माधव गोटे गुरुजी, विजय नामवाड, अरविंद नामवाड, अर्जुन नामवाड, दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एम.जे. वाघमारे यांनी केले.