नांदुर्गा शाळेचे नाव आदर्श शाळा यादीतून वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:20 IST2021-03-17T04:20:04+5:302021-03-17T04:20:04+5:30
औसा तालुक्यातील नांदुर्गा जिल्हा प्ररिषद केंद्रीय शाळेची शासनाच्या २६ ऑक्टाेबर २०२० नुसार आदर्श शाळा म्हणून निवड झाली आहे. याबाबत ...

नांदुर्गा शाळेचे नाव आदर्श शाळा यादीतून वगळले
औसा तालुक्यातील नांदुर्गा जिल्हा प्ररिषद केंद्रीय शाळेची शासनाच्या २६ ऑक्टाेबर २०२० नुसार आदर्श शाळा म्हणून निवड झाली आहे. याबाबत शासनाच्या निवड यादीत शाळेचे नावही आले हाेते. त्यानंतर १ फेब्रुवारी २०२१ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध झाली. या यादीतही येथील शाळेचे नाव आदर्श शाळा म्हणून कायम हाेते. त्याबाबत आदर्श शाळेसाठी बैठक घेण्यात आली. शासनाच्या सूचनेनुसार लाेकसहभाग आणि लोकवाटा जमा केला. ग्राम पंचायत कार्यालय, नांदुर्गा यांच्या सहकार्याने अधिक भरिव निधी जमा करण्यात आला आहे. त्याचबरोबबर आदर्श शाळेच्या निर्मितीसाठी बाला उपक्रमांतर्गत निर्माण झालेल्या शाळांना भेटी देऊन गावपातळीवर आदर्श शाळा विकसासाठी चर्चा सत्रे भरविण्यात आली हाेती. ही सर्व प्रक्रिया सुरु असताना अचानकपणे ५ मार्च २०२१ च्या शासन निर्णयानुसार यादीत बदल करुन जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे निवड यादीतील नावच रद्द करण्यात आल्याचे समाेर आले आहे. याची पूर्वकल्पना संबधीत शालेय व्यवस्थापन समिती अथवा ग्रामस्थांना देण्यात आली नाही. परिणामी, हा शाळा आणि गावावर अन्याय झाला असल्याची भावना संतप्त ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. शाळेचे नाव निवड यादीतून रद्द का करण्यात आले. याची चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने लेखी निवदेनाद्वारे करण्यात आली आहे.