सुमनदेवी संस्थेच्या वतीने नामविस्तार दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:22 IST2021-01-16T04:22:41+5:302021-01-16T04:22:41+5:30

पोषण आहार कामगारांचे प्रश्न सोडवावेत लातूर : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात, यासाठी शालेय पोषण आहार ...

Name extension day on behalf of Sumandevi Sanstha | सुमनदेवी संस्थेच्या वतीने नामविस्तार दिन

सुमनदेवी संस्थेच्या वतीने नामविस्तार दिन

पोषण आहार कामगारांचे प्रश्न सोडवावेत

लातूर : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात, यासाठी शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने शिक्षण उपसचिव राजेंद्र पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रभाकर नागरगोजे, मधुकर मोकळे, डॉ. अशोक थोरात, मीरा शिंदे, मन्सुरभाई कोतवाल, एन.जी. माळी, विठ्ठल बिराजदार, दिलीप पोफळे, संगीता थोरात यांची उपस्थिती होती.

हसत-खेळत विज्ञान कार्यक्रमाचे आयोजन

लातूर : स्वामी रामानंदतीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने १६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता कचऱ्यातून खेळणी व हसत-खेळत विज्ञान या विषयावर अरविंद गुप्ता यांचे ऑनलाइन व्याख्यान होणार आहे. सहभागी होण्याचे आवाहन डॉ. अभिजित बादाडे, मनोज मुंदडा, गिरीश कुलकर्णी, विकास देवर्जनकर, श्रीनिवास लाहोटी, सुमती जगताप, डॉ. अजित जगताप, अतुल देऊळगावकर यांनी केले आहे. गुप्ता यांनी टाकाऊ वस्तूंपासून ८०० विज्ञान खेळण्या तयार केल्या असून, हजारो मुलांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.

प्राचार्य डॉ. गायकवाड यांचा सत्कार

लातूर : येथील दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड यांचा एयू बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. शिवाजी जवळगेकर, डॉ. सुनील साळुंके, डॉ. प्रदीप सूर्यवंशी, डॉ. अंकुश चव्हाण, अनिलकुमार माळी, डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ.एम.एच. खंडागळे, डॉ. संतोष पाटील, डॉ. रामेश्वर खंदारे, डॉ. नवनाथ भालेराव, प्रा. महेश जंगापल्ले, गोविंद मुंडे आदींची उपस्थिती होती.

मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

लातूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन शहरात साजरा करण्यात आला. यावेळी रावणराजे आत्राम, ॲड. सुधाकर आरसुडे, ॲड.मधुकर कांबळे, साहेबअली सौदागर, अरविंद कांबळे, रघुनाथ बोरकर, दिलीप गायकवाड, नितीन चालक आदींची उपस्थिती होती. यावेळी ॲड. वसंत उगले यांनी नामविस्तार लढ्याबाबत माहिती दिली.

प्रा. चंद्रकला भार्गव यांना पुरस्कार प्रदान

लातूर : महा-एनजीओ फेडरेशन व सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊरत्न जीवन गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या तथा आदर्श महिला गृहोद्योग संस्थेच्या अध्यक्ष प्रा. चंद्रकला भार्गव यांना पुण्यात प्रदान करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी प्रेमा पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांची उपस्थिती होती.

Web Title: Name extension day on behalf of Sumandevi Sanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.