पीक स्पर्धेत नणंदचे नामदेव म्हेत्रे प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST2021-07-02T04:14:26+5:302021-07-02T04:14:26+5:30
कृषी दिनानिमित्त आणि कृषी संजीवनी मोहिमेच्या समारोप निमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ...

पीक स्पर्धेत नणंदचे नामदेव म्हेत्रे प्रथम
कृषी दिनानिमित्त आणि कृषी संजीवनी मोहिमेच्या समारोप निमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती राधा बिराजदार, उपसभापती अंजली बोंडगे, तालुका कृषी अधिकारी आर.एन. काळे, लातूरच्या कृषी विज्ञान केंद्राचे पी.डी. मताई, पं.स. चे कृषी अधिकारी व्ही.जे. ढाकणे, मंडळ कृषी अधिकारी आर.एम. राठोड, ए.पी. शेळके, एच.एम. पाटील आदी उपस्थित होते.
कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत १२० गावांत विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात ५ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, जमिनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार खताचा संतुलित वापर, रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीन लागवड, ऊस लागवड तंत्रज्ञान, विकेल ते पिकेल आदी संदर्भात माहिती देण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे यांनी सांगितले.
शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत २०२० च्या रब्बी हंगामातील पीक स्पर्धेत ६९ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यात प्रथम क्रमांक नणंद येथील नामदेव म्हेत्रे यांनी मिळविला. द्वितीय क्रमांक दापका येथील सुरेखा राजपाल देशमुख यांनी मिळविला. त्यांनी हेक्टरी ३५.७८ क्विंटल उत्पादन घेतले. तृतीय पारितोषिक कलांडी येथील संभाजी सूर्यवंशी यांनी मिळविला. त्यांनी हेक्टरी ३५.२१ क्विंटल उत्पन्न मिळविले आहे.
कार्यक्रमाची प्रस्तावना निलंगा तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे यांनी करत वसंतराव नाईक यांच्या विषयाची सविस्तर माहिती दिली. डॉ. मताई पी.डी. पिकावरील कीड रोग मार्गदर्शन केले. तर पं.स.सदस्य हिरीभाऊ काळे यांनी मनोगत व्यक्त केल,पं.स.अध्यक्ष राधा बिराजदार यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न कृषी सहायक सुनील घारूळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पंचायत समिती कृषी अधिकारी गोपाळ ढाकणे यांनी केले.