नागझरी ग्रामपंचायत बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST2021-01-04T04:18:06+5:302021-01-04T04:18:06+5:30
गावातील ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होताच पोलीस उपायुक्त मंचक ईप्पर यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचा प्रस्ताव ठेवला. सर्वांच्या ...

नागझरी ग्रामपंचायत बिनविरोध
गावातील ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होताच पोलीस उपायुक्त मंचक ईप्पर यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचा प्रस्ताव ठेवला. सर्वांच्या एकमताने निवड व्हावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्राचार्य रामचं ईप्पर, डॉ. रावसाहे ईप्पर, निवृत्ती ईप्पर, नागनाथ ईप्पर, हनुमंत ईप्पर, व्यंकट ईप्पर, प्रल्हाद ईप्पर, बालाजी ईप्पर, अनंत ईप्पर, गंगाधर ईप्पर, ज्ञानोबा ईप्पर, नामदेव सूर्यवंशी, श्याम सूर्यवंशी, प्रकाश ईप्पर, अंकुश आलापुरे, गंगाधर नकुले, उद्धव ईप्पर आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस उपायुक्त मंचक ईप्पर म्हणाले, गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणे आवश्यक आहे. त्यामुळे तंटे संपुष्टात येऊन विकास होण्यास मदत होईल. तेव्हा गावकऱ्यांनी सात सदस्यांची बिनविरोध निवड केली.
नूतन सदस्य...
रुक्मिणीबाई ईप्पर, रामकिशन सूर्यवंशी, चंद्रकला ईप्पर, रुक्मिणीबाई मुंढे, नाथराव ईप्पर, उद्धव ईप्पर, शिवाबाई आलापुरे या सात सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.