लातुरात भरदिवसा कत्तीने वार करुन तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:24 IST2021-08-12T04:24:01+5:302021-08-12T04:24:01+5:30

पाेलिसांनी सांगितले, मयत गाेकुळ मंत्री हे आपल्या माेटारसायकलवरून एम.एच. २४ बी.ए. ४३३९ मंगळवारी ३ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले. दरम्यान, ...

Murder of a young man by stabbing him all day in Latur | लातुरात भरदिवसा कत्तीने वार करुन तरुणाचा खून

लातुरात भरदिवसा कत्तीने वार करुन तरुणाचा खून

पाेलिसांनी सांगितले, मयत गाेकुळ मंत्री हे आपल्या माेटारसायकलवरून एम.एच. २४ बी.ए. ४३३९ मंगळवारी ३ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले. दरम्यान, त्यांच्या दुचाकीवर दाेन २० ते २२ वर्षीय दाेन तरुण प्रवास करत हाेते. दरम्यान, दाेघा तरुणांनी सद्गुरुनगरात आल्यानंतर राधाकृष्ण मंदिराच्या पाठीमागील परिसरात भर रस्त्यावरच गाेकुळ मंत्री यांच्या डाेक्यात, पाठीत आणि शरीरावर कत्ती, चाकू, धारदार शस्त्राने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गाेकुळ मंत्री यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पाेलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह भेट देऊन पंचनामा केला आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

खुनाचे कारण अस्पष्ट...

मंगळवारी दिवसाढवळ्या दाेघांनी गाेकुळ मंत्री या तरुणाचा कत्ती आणि चाकूने सपासप वार करत खून केला. घटनेनंतर दाेघे मारेकरी घटनास्थळावरुन पसार झाले. त्यांच्या अटकेसाठी पाेलीस पथक तैनात करण्यात आले आहे. हा खून नेमका काेणत्या कारणासाठी झाला, हे कारण मात्र अद्याप समाेर आले नाही. तपासाअंती खुनाचे कारण समाेर येणार आहे, असेही पाेलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी म्हणाले.

Web Title: Murder of a young man by stabbing him all day in Latur