शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गाेठ्यातील तरुणाचा खून; ‘त्या’ मुलाने काढला काटा, एका दिवसात खुनाचा उलगडा

By राजकुमार जोंधळे | Updated: December 31, 2023 23:12 IST

गुन्ह्याची कबुली : एका दिवसात खुनाचा उलगडा...

औसा (जि. लातूर) : तालुक्यातील वडजी येथे शेतातील गाेठ्यात झाेपी गेलेल्या तरुणाचा अल्पवयीन मुलाने काटा काढल्याचे रविवारी समारे आले आहे. ताब्यात घेतलेल्या मुलाने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मयत रणजित तानाजी माळी याच्यावर पाळत ठेवत त्याचा झोपेतच धारधार शस्त्राने डोक्यात वार करून हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी समाेर आली. याबाबत भादा पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून खुनाचा ११ तासातच उलगडा केला.

पाेलिसांनी सांगितले, वडजीतील मयत रणजित तानाजी माळी (वय २५) हा दुग्धव्यवसायासह टेम्पो चालवित होता. दरम्यान, त्याला व्यवसायाची आवड हाेती. अविवाहित असलेल्या रणजित माळीचे गावातील एक महिलेशी प्रेमप्रकरण जुळले होते. याबाबतची कुजबुज गावात सुरू हाेती. त्या महिलेच्या अल्पवयीन मुलालाही याची कुणकुण लागली हाेती. आपल्या आईसाेबत तरुणाचे प्रेमसंबंध सुरू असल्यामुळे त्या मुलाच्या डाेक्यात राग हाेता. यातूनच त्याने मयत तरुणावर गत काही दिवसांपासून पाळत ठेवली. त्यांच्या मागावर असलेल्या मुलाने कट रचला आणि त्याचा काटा काढण्याचे प्लॅनिंग केले. यासाठी शेतीत कामासाठी लागणार असल्याचे कारण सांगत शस्त्राला धार करून घेतली, अशी माहिती पाेलिसांनी दिली.

तरुणावर पाळत ठेवून केला खून...मयत हा त्यांच्या शेतातील गोठ्यात एकटाच मुक्कामी राहत असल्याची माहिती काढली. त्यानुसार रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास मयताच्या मोबाइलवर फोन करून झोपी गेल्याची खात्री केली. फोन उचलला नसल्याने त्याने मध्यरात्री झोपलेला तरुण रणजित माळी यावर शस्त्राने सपासप वार करून हत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी समाेर आली. पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे गतिमान करत खुनाचा तपास केला.

त्या रात्री शेवटच्या माेबाइल काॅलने खुनाला फुटली वाचा...मयताच्या मोबाइलवरील शेवटच्या कॉलने खुनाचा उलगडा झाला. तरुणाचा खून गावातीलच अल्पवयीन मुलगा असल्याचे तपासात समाेर आले. त्याच्या आईसह इतरांना चौकशीसाठी पाेलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत गुन्ह्याचा उलगडा झाला. तपास फौजदार कोव्हाळे करीत आहेत. - बाळासाहेब डोंगरे, सपाेनि. भादा

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी