प्रधानमंत्री किसान योजनेच्या पैशांवरून सख्ख्या भावाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST2021-08-28T04:24:12+5:302021-08-28T04:24:12+5:30
पाेलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील कासार जवळा येथील वैजनाथ आश्रुबा सुडके आणि नागनाथ आश्रुबा सुडके हे दाेघे सख्खे भाऊ आहेत. ...

प्रधानमंत्री किसान योजनेच्या पैशांवरून सख्ख्या भावाचा खून
पाेलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील कासार जवळा येथील वैजनाथ आश्रुबा सुडके आणि नागनाथ आश्रुबा सुडके हे दाेघे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्याकडे थाेडीफार शेती आहे. दरम्यान, प्रधानमंत्री किसान याेजनेचे दाेन हजार रुपये खात्यावर जमा झाले हाेते. यातील एक हजार रुपये मला दे म्हणून नागनाथ याने वैजनाथकडे तगादा लावला हाेता. नागनाथ हा दारूच्या आहारी गेला आहे. यासाठी वैजनाथने दाेन हजारातील एक हजार रुपये नागनाथ यांच्या पत्नीकडे दिले. हे एक हजार मला न देता माझ्या पत्नीकडे कशासाठी दिलास, असे म्हणून नागनाथ सुडके याने २४ ऑगस्टराेजी रात्री ८.३० वाजता भांडायला सुरुवात केली. भांडणात वैजनाथ यांच्या डाेक्यात नागनाथने काठी घातली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वैजनाथला कुटुंबीयांनी लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, बुधवारी २५ ऑगस्ट राेजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत गातेगाव पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आराेपी नागनाथ सुडके याला ताडकी मार्गावरून अंबाजाेगाईकडे पायी जात असताना पाेलिसांनी अटक केली. त्याला लातूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे. तपास पाेलीस उपनिरीक्षक किशाेर कांबळे करीत आहेत.