आठ महिन्यांंच्या मुलाचा खून, पित्याला जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST2021-09-22T04:23:53+5:302021-09-22T04:23:53+5:30

लातूर : शहरातील संजयनगर येथे बापानेच आपल्या आठ महिन्यांंच्या मुलास माझ्या पोटचा नाहीस असे म्हणत चटके दिले, डोळ्यांंत मिरची ...

Murder of an eight-month-old boy, father sentenced to life imprisonment | आठ महिन्यांंच्या मुलाचा खून, पित्याला जन्मठेपेची शिक्षा

आठ महिन्यांंच्या मुलाचा खून, पित्याला जन्मठेपेची शिक्षा

लातूर : शहरातील संजयनगर येथे बापानेच आपल्या आठ महिन्यांंच्या मुलास माझ्या पोटचा नाहीस असे म्हणत चटके दिले, डोळ्यांंत मिरची टाकली तसेच मारहाण करून जिवे मारल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी आरोपी सोमनाथ शिवाजी साळुंके यास जन्मठेप व ५ हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. लातूर शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या संजय नगर येथे आरोपी साेमनाथ शिवाजी साळुंके याने स्वत:च्या आठ महिन्यांंच्या मुलास हा माझ्या पोटचा नाही या कारणावरून मुलास चहाच्या ग्लासने चटके देणे, डोळ्यांंत मिरची टाकणे, मारहाण करून तसेच दोन्ही पाय फाकवून ठार केल्याची घटना २०१९ मध्ये घडली होती. विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात एकूण ८ साक्षीदारांंच्या जबानी नोंदवण्यात आल्या. अटक पंचनामा, इनक्वेस्ट पंचनामा,जप्ती पंचनामा, घटनास्थळ पंचनामा तसेच रासायनिक विश्लेषण अहवाल, शवविच्छेदन अहवाल अभियोग पक्षाने सिद्ध केला. राधा मगर, गीताबाई व शंकर मगर यांच्या साक्षीसोबत पोलीस कर्मचारी दैवत सिरसाळे, बळीराम आडे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. स्वतःच्या असहाय्य मुलाची निर्दयीपणाने क्रूर हत्या केल्याचे सिद्ध झाल्याने आरोपी सोमनाथ शिवाजी साळुंके यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील संतोष वसंतराव देशपांडे यांनी काम पाहिले. ट्रायल माॅनिटरिंग सेलचे कामकाज तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आवेज काझी व सपोनि तोटेवाड यांनी केले. कोर्ट पैरवीचे कामकाज पोलीस हवालदार कोतवाड यांनी केले.

Web Title: Murder of an eight-month-old boy, father sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.