राज्यातील ५०० आदर्श शाळांमध्ये मनपा शाळेचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:20 IST2021-03-08T04:20:00+5:302021-03-08T04:20:00+5:30

यापूर्वी शाळेस आयएसओ मानांकन प्राप्त असून दरवर्षी १०० टक्के निकालासह अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळवत असतात. शासनाने निवड ...

Municipal school is one of the 500 ideal schools in the state | राज्यातील ५०० आदर्श शाळांमध्ये मनपा शाळेचा समावेश

राज्यातील ५०० आदर्श शाळांमध्ये मनपा शाळेचा समावेश

यापूर्वी शाळेस आयएसओ मानांकन प्राप्त असून दरवर्षी १०० टक्के निकालासह अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळवत असतात.

शासनाने निवड केलेल्या या ५०० शाळांमध्ये पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सद्य:स्थितीत लातूर मनपाच्या शाळेत ४०० हून अधिक पटसंख्या आहे. त्यापुढे जावून किमान १०० ते १५० पटसंख्या असणे अपेक्षित आहे. शाळेच्या परिसरात अंगणवाडी अर्थात पूर्व प्राथमिक वर्ग, आकर्षक इमारत, विद्यार्थीसंख्येनुसार वर्गखोल्या उपलब्ध आहेत. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, हॅण्डवॉश स्टेशन, मध्यान्ह भोजनासाठी स्वयंपाकगृह आणि भोजनकक्षही उपलब्ध असून आत या शाळेचा आदर्श शाळा उपक्रमात सहभाग झाल्याने अधिक प्रमाणात शैक्षणिक साहित्य व खेळाचे साहित्य, विद्यार्थ्याना वाचनासाठी वाचनालय व ग्रंथालयासह प्रत्येक वर्ग संगणक कक्ष व व्हर्च्युअल क्लासरूमची सुविधा नव्याने मिळू शकणार आहेत.

राज्यातील ५०० शाळांमधून मनपाच्या शाळेची निवड केल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त अमन मित्तल, मनपा शिक्षणाधिकारी जाधव, मुख्याध्यापक धोंडिराम भिंगोले नगरसेविका पूजा पंचाक्षरी, फरजाना बागवान, गौरव काथवटे यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.

Web Title: Municipal school is one of the 500 ideal schools in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.