मुंबई-पुणे एसटी रिकामीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:19 IST2021-03-25T04:19:17+5:302021-03-25T04:19:17+5:30
रातराणीच्या केवळ १० बसेस... लातूर डेपोच्या रातराणीसाठी केवळ १० बसेस प्रवाश्यांच्या दिमतीला आहे. कोल्हापूर, पुणे, सांगली, मिरज, मुंबई, हैद्राबाद ...

मुंबई-पुणे एसटी रिकामीच !
रातराणीच्या केवळ १० बसेस...
लातूर डेपोच्या रातराणीसाठी केवळ १० बसेस प्रवाश्यांच्या दिमतीला आहे. कोल्हापूर, पुणे, सांगली, मिरज, मुंबई, हैद्राबाद या मार्गावर या रातराणी धावत असल्या तरी प्रवाशी घटले आहे. केवळ ५० टक्के भारमानाने त्या चालविल्या जात आहेत. लॉकडाऊननंतर काही दिवस या गाड्यांना आरक्षण होते. परंतू आता प्रवाशीच नसल्याने आरक्षण बंद करण्यात आले आहे.
मुख्यालयातून धावतात १७९ बसेस...
लातूर डेपोच्या मुख्यालयात १७९ बसेस धावतात. लॉकडाऊन उठल्यानंतर या बसेसना ५० टक्यांपेक्षा अधिक प्रवासी मिळत होते. मात्र, गेल्या २० दिवसांमध्ये प्रवासी घटले आहेत. बाहेरुन येणा-या ४०० बसेसनाही प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाला आहे. कोरोना वाढल्यामुळे पुन्हा एकदा एसटीवर संकट आले आहे. कोरोना नियमांचे पालन करुन सेवा देण्यात येत असली तरी प्रवासच थांबला आहे. त्यामुळे सध्या एसटी पुन्हा एकदा तोट्यात आली आहे.
२६ फे-या बंद...
शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हा अंतर्गत बसेस सुरु करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना पासेसही देण्यात आले होते. परंतू सुरु झालेले शाळा-महाविद्यालये बंद झाल्याने बसेसच्या २६ फे-या बंद करण्यात आल्या आहेत. साध्या बसेसनाही जिल्हा अंतर्गत प्रवासी नसल्याने काही मार्गावरील बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा बाहेर जाणा-यांची संख्या घटली...
रातराणी तसेच लांब पल्यांच्या गाड्यामधून जिल्हाबाहेर जाणा-यांची संख्या पाच ते सहा हजारांच्या आसपास होती. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढल्याने प्रवाशी संख्या घटली आहे. लॉकडाऊननंतर ७० टक्के भारमान होते. मात्र आता या गाड्यांसाठी ३५ ते ४० टक्के भारमान आहे.
कोट...
लांब पल्ल्यांच्या गाड्यासह जिल्हाअंतर्गत प्रवासी सेवा जोरात सुरु झाली होती. परंतू कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढल्याने प्रवाश्यांवर परिणाम झाला आहे. प्रवाशी संख्या घटली आहे. जिथे १० प्रवासी मिळत हाेते तिथे ५ प्रवासी मिळत आहे. त्यामुळे लातूर बसस्थानकातून विद्यार्थ्यांसाठी असलेल्या २६ फे-या बंद करण्यात आल्या आहेत. सर्वच बसेसचे भारमान ५० टक्क्यांनी घटले आहे. - जाफर कुरेशी, आगार व्यवस्थापक, लातूर