महावितरणचे दुर्लक्ष, विद्युत डीपी उघड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:46 IST2020-12-11T04:46:24+5:302020-12-11T04:46:24+5:30
... पोषक वातावरणामुळे हरभऱ्याचे पीक बहरले वलांडी : देवणी तालुक्यातील वलांडी परिसरातील जलसाठे तुडुंब आहेत. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत ...

महावितरणचे दुर्लक्ष, विद्युत डीपी उघड्या
...
पोषक वातावरणामुळे हरभऱ्याचे पीक बहरले
वलांडी : देवणी तालुक्यातील वलांडी परिसरातील जलसाठे तुडुंब आहेत. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत अधिक रबीचा पेरा झाला आहे. दरम्यान, पोषक वातावरणामुळे हरभरा, गहू बहरत आहे. सध्या या भागातील शेतकरी रबी पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करीत आहेत. पिके जोमात आल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. रबीतून चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
...
सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी हतबल
औराद शहाजानी : गेल्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक म्हणजे ४ हजारांपेक्षा अधिक भाव मिळाला होता. परंतु, सध्या दर घटले आहेत. त्यामुळे शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणण्यास टाळत आहेत. परिणामी, बाजारपेठेतील आवक घटली आहे. हमीभाव खरेदी केंद्राकडे तर शेतकऱ्यानी पाठ फिरविली आहे.
...