पाच हजाराची लाच स्वीकारताना महावितरणच्या अभियंत्यास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST2021-02-05T06:24:45+5:302021-02-05T06:24:45+5:30
सूत्रांनी सांगितले, उदगीर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयात कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता गुरुप्रसाद विनायक कोसगी (४८ ...

पाच हजाराची लाच स्वीकारताना महावितरणच्या अभियंत्यास पकडले
सूत्रांनी सांगितले, उदगीर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयात कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता गुरुप्रसाद विनायक कोसगी (४८ रा. न्यू पाच्छा पेठ, गीतानगर, साेलापूर) याने तक्रारदारास डीपीच्या प्रस्तावावर सही करून, प्रस्ताव पुढे पाठविण्याच्या कामासाठी पाच हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली हाेती. दरम्यान, तक्रारदाराने याबाबत लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची प्रारंभी पडताळणी केली. त्यानंतर मंगळवारी उदगीर येथील महावितरण विभागाच्या विभागीय कार्यालयात सापळा लावला. तक्रारदाराकडून पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना पंचासमक्ष त्यास रंगेहात पकडण्यात आले. यावेळी एसीबीच्या पथकाने सदर अधिकाऱ्यास अटक केली. याबाबत उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.