मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:30+5:302021-06-04T04:16:30+5:30
उदगीर : मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण पूर्वीप्रमाणेच ठेवावे, या मागणीसाठी रिपाइं (आठवले गट)च्यावतीने गुरुवारी येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन ...

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी आंदोलन
उदगीर : मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण पूर्वीप्रमाणेच ठेवावे, या मागणीसाठी रिपाइं (आठवले गट)च्यावतीने गुरुवारी येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर रिपाइंचे जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे, तालुकाध्यक्ष ॲड. प्रफुल्लकुमार उदगीरकर, सुशीलकुमार शिंदे, जळकोट तालुकाध्यक्ष विनोद कांबळे, सुधीर घोरपडे, हुसेन शेख, विष्णू केंद्रे, राहुल कांबळे, रवी बनसोडे, अतुल कांबळे, पुरंदर बोडके, परमेश्वर बन, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मागासवर्गीयांच्या पदोन्नतीबाबत राज्य सरकारने ७ मे रोजी अन्यायकारक अध्यादेश काढला आहे. त्याविरोधात येथील तहसील कार्यालयासमोर रिपाइं (आ.)च्यावतीने जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागासवर्गीयांना पदोन्नतीत मिळणारे आरक्षण अचानक रद्द करून राज्य शासनाने अन्याय केला आहे. हे आरक्षण तत्काळ लागू करावे, अशी मागणी करण्यात आली.